फलटण :- लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे,त्यानिमित्ताने दर रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणेत येणार आहेत.या कार्यक्रमात दर रविवारी म्हणजेच दिनांक 30 सप्टेंबर, 7 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर या सर्व रविवारी फलटण तालुक्यातील गावातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करणेत आले आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदार नोंदणीचे काम करणार आहेत.त्यामुळे पात्र व्यक्ती मतदार होण्यापासून वंचित राहू नये,यासाठी नाव नोंदणी,तसेच नाव वगळणे, मयत असेल तर तशी नोंद करणे अशी कामे मतदान केंद्रावर केली जाणार आहेत. यासाठी सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकानी मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना निवडणूक प्रशासनाकडून देणेत आल्या आहेत.
1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर ज्या व्यक्तींची वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांनी व विशेष करून महिला, दिव्यांग, उपेक्षित वाड्या वस्त्यावरील लोक, दुर्लक्षित लोक तसेच त्रुतियपंथीय यांनी विशेष मोहिमेच्या दिवशी आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे फॉर्म नंबर 6 भरून घेऊन आपली मतदान नोंदणी करून घ्यावी. ज्यांचे मतदार यादीतील नावात वा इतर दुरुस्ती असल्यास त्यांनी दुरुस्तीबाबत आवश्यक पुराव्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे दुरुस्तीबाबत फॉर्म भरून द्यावा जेणेकरून मतदार यादी अचूक व परिपूर्ण होईल, तसेच राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बुथलेवल प्रतिनिधी नेमावेत व मतदार नोंदणीच्या या कार्यक्रमास सहकार्य करावे असे अवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष जाधव व तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment