"फलटण तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत" - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, October 7, 2018

"फलटण तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत"

बिबट्याचे आढळून आलेले ठसे


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

फलटण =फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील आसू परिसरातील डांगे वस्ती, फुले वस्ती,गोसावी वस्ती,निंबाळकर वस्ती, शिंदेनगर परिसरात गेल्या पंधरवड्यापासून हिंस्ञप्राण्याने घुमाकूळ घातला आहे.वनाधिकारीनी संबंधीत प्राण्यांच्या पायाचे ठस्से घेऊन वरीष्ठांकडे पडताळणी करून हे ठस्से बिबट्ट्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे असे फलटण वन अधिकारी यांनी सांगितले. 



गेली पंधरा दिवसापासून आसु परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फस्त केले जात आहे. माञ हल्ला करणारे प्राणी अद्याप नागरीकांचे निर्दशनास न आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. पाच कि.मी अंतराच्या परिसरातील आतापर्यंत आठ-दहा शेळ्या,सहा-सात कुञी, कोंबड्या मारून फडसा पाडला आहे. सदर घटना दिवसाआड घडत असल्याने राञी अपराञी शेतीपिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी वर्गातला जावे लागते राञी परिसरात विज पुरवठा खंडित झाल्यामुळे हिस्ञप्रांण्याच्या भितीने फिरणे मुस्किल झाले आहे.या परिसरातून शालेय विद्यार्थी आसू,शिंदेवाडी, पवारवाडी ,बाहेरगावी जात असतात त्यांच्या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वेळोवेळी वन अधिकारी, पोलिस यंञणेस कळविण्यात आल्या नंतर वन विभागाने पायाचे ठस्से घेऊन वरीष्ठांकडे पडताळणी केले असता हे ठस्से बिबट्ट्याचे असल्याचे निदर्शनास आले असुन वन विभाग त्यांच्या पातळीवर तपास सुरु असुन त्यांच्या पडताळणीतून बिबट्या असल्या बाबत शक्यता व्यक्त केली जात आहे ? मात्र बिबट्याचा वावर परिसरात असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे.  तरी सदर याबाबत नागरीकांनी दक्षता घेण्याच्या सुचना वन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या परिसरात उस शेती जास्त असल्याने या भागात त्याला लपून बसण्यासाठी चांगले क्षेत्र आहे त्यामुळे हा बिबट्या ऊसात दिवसभर बसून रात्री अचानक कुत्री व शेळ्यांनवर हल्ला करीत आहे.



नागरीकांनी,महिलांनी विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी. ग्रामस्थांना संध्याकाळी एकटे बाहेर पडू नये. नागरिकांनी अफवा वर विश्वास ठेवू नये. बिबट्या निदर्शनास आल्यास वन विभागास कळवावे. ग्रामस्थांनी वन विभागाला सहकार्य करावे, परिसरात आणि वाडी वस्तींवर दवंडी देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नागरीकांनी घाबरून जावू नये, वन विभागाकडून गस्त घालण्यात येत असून काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत असे वन क्षेत्रपाल फलटण एस.के.घाडगे यांनी सत्य सह्याद्रीशी बोलताना सांगितले.



पिंजरा लावण्याची मागणी 

गेल्या पंधरा दिवसापासून या भागात बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फस्त आहे. हि बाब अतिशय गंभीर असून यावर लवकरात लवकर वन विभागाने कार्यवाही करावी व या भागात पिंजरा लावण्यासाठी प्रधान वनपरिक्षेत्र अधिकारी यांची परवानगी घेऊन पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.


 'ट्रॅप कॅमेरा' बसवण्याची गरज

घनदाट जंगलांमध्ये वाघांची मोजणी, जंगलातील अवैध शिकारी, वृक्षतोड यासह इतर वन्यजीवांचा वावर, अधिवास यांच्या अभ्यासासाठी वापर होतो. दीडशे फूट अंतरापर्यंत सर्व गोष्टी चित्रीत होतात. अंधारातही चित्रीकरण हाेते. आसू परिसरात पिंजऱ्यासह ट्रॅप कॅमेरा बसवल्यास बिबट्या पकडण्यासाठी मदत होईल.


बिबट्या नेमका आला कोठून? 

या भागात प्रथमतःच बिबट्याचा वावर आढळलेला आहे. या भागात बिबट्या आला कोठून हा एक संशोधनाचा विषय आहे. आसू लगत नीरा नदीचा भाग आहेत्यामुळे  उत्तर भागाकडून येण्याची शक्यता कमी आहे. पुर्व भागातून नदीकाठच्या ऊस क्षेत्रातून बिबट्या जिल्ह्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


बिबट्या मादी असल्याचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार आसु भागात बिबट्या मादी असल्याचा संशय असून ती मादी असल्यास तिची पिल्ले ऊस पिकांत  असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment