सातारा: शिवेंद्रसिंह भोसले यांनी भाजप प्रवेश करताच पाठोपाट उदयनराजेंनी सुद्धा राष्ट्रवादीला धक्का देत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करून अवघ्या तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिल्याने संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शिवेंद्रराजेंच्या भाजप मध्ये जाण्याने त्यांची जिल्ह्यात ताकद वाढेल आणि शिवेंद्रराजेंची ताकद वाढल्यास आपले राजकीय अास्तित्व संपुन जाईल. या भितीपोटी छ.उदयनराजेंच्याच जवळ असणार्या काही नेत्यांनीे व कार्यकर्त्यांनी दयनराजेंचा हा भाजप प्रवेश करवुन घेतला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
काल खा.शरद पवार यांचे नाव घेताच छ.उदयनराजे भावनिक होत त्यांना रडू कोसळले. खा.पवारांबाबत छत्रपती येवढे हळवे असतील तर त्यांनी भाजप प्रवेश का केला याचीच चर्चा जिल्ह्यासह राज्यभरात सुरू झाली.
खासदारकीचा अवघ्या तीन महिन्यातील कार्यकाळानंतर राजीनामा देण्यामागे व छ.उदयनराजेंचा भाजप प्रवेशामागे दोन महत्त्वपुर्ण कारणे समोर येत असून सद्या या कारणांचीच चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
पहिले चर्चेत असणारे कारण दोन बंधू मधला वाद..
.उदयनराजें व त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे यांचे राजकीय वैर संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले.
मात्र या वैरामुळे जिल्ह्याचा व शहराचा विकास खुंटु नये म्हणुन छ.शिवाजी महाराज यांच्या मध्यस्थीने आदालतवाड्यात अजिंक्यतारा किल्याचा साक्षीने सातार्यात उदयनराजें व शिवेंद्रराजे मनोमिलन पँटर्न समोर आले.या मनोमिलना नंतर जिल्ह्याचा व शहराचा विकास होईल. या द्रुष्टीने पाऊले पडत असताना दोन्ही राजेंच्या दुसर्या फळीतील नेत्यांची मने मात्र दोन्ही राजेंना जुळवता आली नसल्याने शहरातील कामांमध्ये श्रेयवादाच्या ठींणग्या अधिक पडू लागल्या या ठींणग्यांचा वणवा लागून त्याच अजिक्यंतारा किल्ल्यासमोर दोन्ही राजे पुन्हा एकदा समोरा-समोर येवून ठेपले. मनोमिलन तुटल्याचे जाहीर झाल्यानंतर सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीत या दोन्ही राजेंचे वैर जास्तच विकोपाला गेले. या वादाचे पर्यावसन नगराध्यक्ष पदाचा निवडणूकीत शिंवेंद्रराजे यांच्या पत्नी छ.वेंदातिंकाराजे यांच्या पराभव व्हाया सुरूची राडा इथपर्यंत गेले.
या पराभवामुळे व सुरूची राड्यामुळे उदयनराजें व शिंवेद्रराजे यांच्यातील दरी आणखीनच रूंदावली.दरम्यानच्या काळात या दोन्ही राजेंमध्ये अनेक खटके उडाले. २०१९च्या लोकसभा निवडणूकीत उदयनराजेंचे काम करणार नसल्याचे शिंवेद्रराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड निर्णय घेतला. परंतू खा.शरद पवार यांच्या मध्यस्थी नंतर हा वाद काही काळ निवळला. मात्र खासदारकीमध्ये विजयी झालेले उदयनराजेंना कमी लिडमिळाल्याने त्यांना अंगावर गुलाल न घेता थेट शिवेंद्रराजें यांच्यामुळेच निवडणूकीत लिड कमी झाल्याचा आरोप त्यांच्याकडून अप्रत्यक्ष व कार्यकर्त्यांकडून प्रत्यक्ष होवू लागला.
या आरोपांबाबत शिवेंद्रराजेंनी वेळोवेळी शरद पवार यांच्याशी चर्चा केल्या.परंतू पवारांकडून उदयनराजेंनाच झुकते माप दिले जात असल्याचे शिवेंद्रराजेंना वाटू लागल्याने तसेच त्यांच्या बद्दल होणार्या आरोपांना कंटाळून लोकसभेनंतर अवघ्या दोन महिन्यात राष्ट्रवादी सोडून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. भाजपालाही सातारा जिल्ह्यात स्टार चेहरा नसल्याने तसेच छत्रपतींचे वंशज शिवेंद्रराजे पक्षात प्रवेश करत असल्याने भाजपाने त्यांचा प्रवेश लागोलाग करून घेत.
शिवेंद्रराजेंना ताकद देण्याचे काम भाजप कडून होवू लागले. जिल्ह्यात जर शिवेंद्रराजेंना भाजपकडून अशी ताकद मिळू लागली तर जिल्ह्यात शिवेंद्रराजेंचा दबदबा वाढेल.तसेच आगामी जिल्ह्यातील नगरपालिका,जिल्हापरीषद,पचांयत समिती निवडणूकांमध्येही शिंवेद्रराजेंना भाजप कडून मोठी ताकद मिळाली तर या निवडणूकांमध्ये शिवेंद्रराजेंचा वरचष्मा दिसून येईल. आणि या सर्वात आपले राजकीय अस्तीत्व संपून जाईल ही भिती छ.उदयनराजेंच्या जवळील कार्यकर्त्यांना वाटू लागली. यामुळे छ.उदयनराजेंही भाजप प्रवेश करणार असल्याचा बातम्या त्यांचा कार्यकर्त्यांमार्फत पेरण्यास सुरुवात केली.
मात्र सद्याच्या घडीला भाजप प्रवेश करून काहीही फायदा होणार नाही याची उदयनराजेंना पुरेपुर कल्पना असल्याने तसेच खुद्द शरद पवार यांनी भेट घेवून त्यांची समजूत काढल्याने प्रवेशाचा चर्चां बाबत छ.उदयनराजेंनी पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला तसेच मी भाजप प्रवेश करणार नाही अशी घोषणाही केली.
पण त्यांच्याच जवळील काही नेते मात्र उदयनराजे भाजपमध्ये जाणार असे ठाम पणे सांगत सुटले होते. शेवटी छत्रपतींच्या जवळच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा मनात शिवेंद्रराजे बद्दल असलेली भिती व आपणही सत्तेत जावून जिल्ह्यात आपली ताकद आणखी वाढवू शकतो.अशी अटकळ कार्यकर्ते त्यांच्यासमोर बांधू लागल्याने सरतेशेवटी कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय उदयनराजेंच्या गळी उतरवून त्यांना भाजप प्रवेश करण्यास भाग पाडले.
दुसरे चर्चेत असणारे कारण म्हणजे...
छ.उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्या वादामुळे अनेक प्रमुख कार्यकर्त्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांमुळे दोन्ही राजेंचे कार्यकर्ते मेटाकुटीला आले होते. त्यात शिवेंद्रराजेंनी भाजप प्रवेश केल्यामुळे
यातही शिवेंद्रराजेंकडून आपल्याला त्रास होवू शकतो. अशीही भिती उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास या गोष्टी टाळता येतील अशी अटकळ कार्यकर्ते बांधत होते. त्यामुळे उदयनराजेंनी लवकरात लवकर भाजप मध्ये प्रवेश करावा यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू होते. अशीही चर्चा जिल्ह्यात सुरू असल्याने छ.उदयनराजेंचा भाजप प्रवेश शिवेंद्रराजें बाबत वाटत असणार्या भितीमुळे कार्यकर्त्यांकडून करूवून घेतला असावा.असेच चित्र सद्या समोर येत आहे. या सर्व घडामोडीत आगामी पोटनिवडणूकीत काही दगा फटका झाल्यास याची जबाबदारी स्वत: उदयनराजें घेणार की त्यांचा भाजप पक्ष प्रवेश करवून घेणारे जवळचे नेते व कार्यकर्ते घेणार अशी चर्चाही सद्या जिल्ह्यात सुरू आहे.
भाजप प्रवेश झाला पण कीती कार्यकर्ते सदस्य झाले?
छ.उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपची वाट धरली. यानंतर भाजप कडून राबविण्यात येणार्या मिस्ड् काँल द्या भाजपचे सदस्य बना या मोहीमेत उदयनराजेंच्या कीती कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. हे अजूनही समजू शकले नाही. जर उदयनराजेंच्या जवळील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मिस्ड् काँल देवून भाजपचे सदस्य पद स्विकारले नसेल तर वरील चर्चां खर्या असल्याचाच जिल्ह्यात मेसेज जावू शकतो हे तितकेच खरे

0 Comments