राजेंद्र पवार
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
रहिमतपुर
विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची इच्छुक संभाव्य उमेदवार चाचपणी सुरु
आहे.मागील विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघुन इच्छुकांनी मतदारसंघातील
भौगोलिक आभ्यास बऱ्यापैकी केला असुन मीच योग्य असल्याचा कांगावा ,गवगवा करत
असल्याचे मतदारसंघातील सध्या चित्र असुन पक्षांच्या वरिष्ठांपर्यंत तसा
मेसेज फॉरवर्ड झाल्याचे सांगितले जाते.त्यामुळे कार्यकर्ते, समर्थक नेता
सांगेल तसं पण व्यासपिठाचा अंदाज घेवुन मेळाव्यात उपस्थिती दाखवत असल्याचे
चित्र आहे.
सध्या
प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर जास्तीत जास्त उमेदवार निवडुन आणण्यासाठी
तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात आहे.उमेदवारांचे राजकीय भवितव्य
आजमावण्यासाठी पक्षाचा प्रभाव एकनिष्ठा तपासली जात आहे.आमदारकीचे स्वप्न
साकार करण्यासाठी सतत जनसंपर्क आणि मतदारसंघातील अडचणी सोडवण्यात पुढाकार
घेणाऱ्या उमेदवारांना ʻमनासारखेʼ सगळे होणार का?असा प्रश्न पडला आहे.
लोकप्रतिनिधी म्हणुन जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या उमेदवार ʻकोण ʻकेवळ
आश्वासने देवुन मतदारसंघात निवडुन गेल्यानंतर न फिरकणाऱ्या उमेदवारांबद्दल
मतदारांच्यात नाराजी हा देखील कळीचा मुद्दा आहे.पक्ष आपल्याला उमेदवारी
देईल मीच आमदार अशीही स्वप्ने इच्छुकांना अस्वस्थ करीत आहेत . कोण काय करतय
कुठं जातय यावर देखील बारकाईने लक्ष ठेवणारी यंत्रणा कामाला लागली
आहे.राष्ट्रीय मुद्यांवार चर्चा करताना स्थानिक समस्यांबाबत एकमेकाला
माझंच खरं असं वातावरण सध्या आहे.
मागिल
निवडणुकीचे मुद्दे,कोण कसं हाय, मतदारसंघात कोण योग्य ,यावेळेस बदल होईल,
कोण कुणाला मदत करणार अशा चर्चांनी तरुणाई विचारमंथन सुरु असल्याचे चित्र
सगळीकडे असल्याचे समजते.आघाडी झाली युती कधी होणार का भाजपा शिवसेना
स्वतंत्र लढणार ? विधानसभेपासुन ʻवंचितʼ राहु नये अन्य प्रादेशिक राजकीय
पक्ष मनसे मैदानात उतरणार अशा चर्चा सूरु आहेत

0 Comments