योगेश गायकवाड
दहिवडी: महाराष्ट्राभरतुन
पाणी फैंडेशनची सर्वात मोठी चळवळ जर कुठे उभी राहिली आसेल तर ती सातारा
जिल्ह्यातील माण तालुक्यात हे सर्व राज्याने पाहिले आहे.या भागातील
लोकांनी दुष्काळी तालुका म्हणून लागलेला कलंक पुर्णपणे पुसण्याचा प्रामाणिक
प्रयत्न आपल्या कामातून केला हे आपणास पाहायला मिळत आहे.
गेल्या
तिन वर्षात सतत पहिल्या तिन नंबर मधील पहिला नाहीतर दुसरा नंबरवरती माण
तालुक्याचे नाव कोरले गेले आहे. यामध्ये विशेष करुन टाकेवाडी,बिदाल
,भांडवली ,शिंदी या गावंनी उल्लेखनीय आशा प्रकारे कामे केली आहेत. आणि
त्याच प्रमाणे नंबर ही मिळवले आहेत. यामध्ये पाणी फैंडेशनचे काम एवढे आखीव
आणि रेखीव पद्धतीने करण्यात आले आहे की इथल्या कामांची पाहणी करण्यासाठी
महाराष्ट्राभरातुन पर्याटक तसेच महाविद्यालयातील मुले येत आहेत ही बाब सतत
दुष्काळी तालुका म्हणून कलंक पुसल्यासारखी आहे कारण इथल्या प्रत्येक
गावातील लोकांनी आपल्या श्रमदानातून ,गावच्या लोकसहभागातून तसेच इतर
सेवाभावी संस्थांकडुन पायथा ते माथे जे काही पाणी वाहुन जात होते. ते पाणी
आडवण्यासाठी सर्व उपया आणि उपचार तयार करुन चांगला प्रयत्न करण्यात आला.
संत ,समाज ,शासन यांच्या माध्यमातून १०० कोटीहून आधीक रकमेची कामे पुर्ण
झाली.
परंतु नेमकी
पाऊसाने पाठ फिरवली ,पाणी प्रश्न सुटला नाहीतर उलट आधिकच बिकट झाला. हि
मोहीम आयशस्वी झाली आसे म्हणून पडद्यामागुन प्रयत्न झाले ,परंतु माणदेशी
चिवट माणसे काम करत गेली प्रयत्न सोडले नाहीत . निसर्गाच्या मनात वेगळच
काही होत त्याने इथल्या मातितील माणसाचे ,कष्ट ,प्रामाणिकपणा,जिद्द ,सातत्य
चेक केले आणि सबंध माण तालुका पाणी पाणी करुन टाकला एकट्या शिंदी खुर्द
व १७ गावांच्या खोऱ्यात ६०० ते ७०० मिमी पाऊसाची नोंद करून टाकली आणि
निसर्ग राजाने केलेल्या कर्तुत्वाला पोचपावती देवुन टाकली. आज माणमध्ये
एकही भांड नाही तेथिल भांड भरल नाही.
या
कामाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसाचा शिवार फेरी दैरा काढुन प्रत्येक
गावातील लोकांना भेटुन त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत आजुन आपणास
यापेक्षाही चांगले काम करावयाचे आहे. यासाठी येथिल कर्तव्यदक्ष
आधिकाऱ्यानी लोकांना प्रत्येक गावातील लोकांना प्रोत्साहन दिले. यातुन
आगामी पाणीदार ,आरोग्यदायी,
समाधानी ,हिरवागार
,आर्थपुर्ण माण , प्रत्येक गाव पाहण्यासाठी राज्यातुन नव्हे तर देशातून
यावे याचा आराखडा करण्याचे नियोजन केले आहे. या साठी प्रत्येक गावाला भेटी
दरम्यान संबोधन करण्यात आले तिथील गावकऱ्यांनी आपण सोबत आसल्यास आम्ही
मागे हटणार नाही आशी घोषणा गावकऱ्यांनी केली.
यावेळी
बनगरवाडी,चिलारवाडी,कुकुडवाड ,मार्डी, विरळी ,दानवलेवाडी, गारवडी
,कारखेल.,हस्तनपुर ,बिदाल ,या गावांना भेट दिली. यावेळी माहाराष्ट्र
राज्याचे मंत्रालयीन उद्योग उपसचिव नामदेव भोसले ,उपजिल्हाधिकारी पोपटराव
मालिकनेर, आतिरीक्त आयकर नितीन वाघमोडे ,कर्यकारी अभियांता बाळासाहेब
झंजे,लक्ष्मण वाघमारे क्रुषिआधीकारी सातारा ,पत्रकार बांधव, विभागीय
सम्नवयक आबा लाड, आजित पवार इतर सर्व गावामध्ये पडलेल्या पाउसाच्या नोंदी
घेतल्या.


0 Comments