Hot Posts

6/recent/ticker-posts

शुक्रवारी शेखरभाऊ गोरे उमेदवारी अर्ज दाखल करणार

म्हसवड  प्रतिनिधी 
माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते शेखरभाऊ गोरे हे माण-खटाव विधानसभा मतदार संघातुन तमाम माण खटावच्या जनतेच पाठबळाव आपला उमेदवारी आर्ज दाखल करणार असुन माण खटाव मधील मतदार जनताच माझा पक्ष , असल्यानेच कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असुन शुक्रवार दि. ४ रोजी  कार्यकर्त्यांनी सकाळी साडे नवू वाजता शेखरभाऊ गोरे कार्यालया समोर मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन  करण्यात आले आहे.

गेल्या दिड ते दोन महिन्यापुर्वी माण-खटावचे युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून तालुक्यात मरगळ आलेल्या शिवसेनेला नवसंजिवनी देण्याचे काम  करत गाव तेथे शिवसेनेचे चित्र घर तेथे धनुष्यबाण पोहचवून पदाधिकारी यांना ताकत देत पस्तीस ते चाळीस हजारांचा महिलांचा "खेळ मांडीयला" हा आदेश बांदेकरांचा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमामुळे माण मधील अनेकांनी  शेखरभाऊ गोरे यांच्या उमेदवारीची धास्ती घेतली होती शिवसेनेत प्रवेश झाल्याने तालुक्यातील पर्यायी मतदार संघातील शिवसैनिकांत एक प्रकारचे चैतन्याचे वातावरण पसरल्याचे दिसत होते कारण तालुक्यातील शिवसेनेला शेखर गोरे सारखा तगडा नेता मिळाला होता विषेश म्हणजे तालुक्यातील शिवसैनिक शेखर गोरे यांनी शिवसेनेत यावे अशी खाजगीत चर्चा करत असताना गोरे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेवुन थेट मातोश्रीवर जावुन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले होते या गोरे यांच्या प्रवेशाने दोन्ही तालुक्यातील शिवसेना चार्ज झाल्याचे दिसत आसताना व आता हक्काचा असलेला माण-खटाव मतदार संघाचा आमदार हा आता शिवसेनेचाच होणार असे वाटत असताना युतीतील पुर्वीचा शिवसेनेचा हक्काचा असणारा माण-खटाव मतदार संघ हा महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडे गेला आहे त्यात माजी आमदार जयकुमार गोरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे कोणती भुमिका घेणार मैत्री पूर्ण लढत कि अपक्ष याकडे सर्वाचे लक्ष लागुन राहिले असले तरी शुक्रवारी आर्ज भरण्याचे आवहान करताना शेखरभाऊ यांनी शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण व शिवसेना नेत्यांचे फोटो लावत कार्यकर्त्याना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे त्यामुळे शुक्रवारी ४ तारखेला सकाळी ९.३० वाजता कार्यकर्त्याच्या उपस्थितीत शेखर गोरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत

Post a Comment

0 Comments