Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा बंद राहणार,व्यापाऱ्यांचा संपात सामील होण्याचा निर्णय


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा:
 केंद्र सरकार विरोधी वातावरण ढवळून निघाले असून रोजच कुठे ना कुठे आंदोलन चालु आहेत.बहुजन क्रांती मोर्चा व तत्सम संघटनेने बुधवार दि.२९ रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
  व्यापारी व इतर संघाटनाबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.विविध संघटना,व्यापारी,शिवसेनेचे नरेंद्र पाटील, प्रकाश गवळी व असंख्य कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातही संपाबाबत अमोल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केली आहेत.
    दोषपूर्ण व अत्यंत अन्यायकारी संविधान विरोधी एनआरसी व सीएए या कायद्याच्या विरोधात,इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या विरोधात बंद आहे.जर केंद्राने सीएए व एनआरसी लादण्यात येणार असेल तर ती,"डीएनए"च्या आधारेच झाली पाहिजे. असे समितीने ठणकावून सांगितले आहे.यामध्ये सातारा जिल्हाही सहभागी होणार आहे.त्याबाबत जिल्ह्यात ठिकठिकाणी सहविचार सभा संपन्न झालेल्या होत्या.अनेक संघटनेच्या प्रतिनिधींनाही भेट देऊन बंदचा पाठिंबाबत चर्चा-विनिमय करण्यात आला. तेव्हा अंतिम आढावा घेण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार-गोष्टी होणार नाहीत,कायदेशीर व शांततेच्या मार्गाने आंदोलने करणे गरजेचे आहे.सार्वजनिक संपत्ती ही राष्ट्राची संपत्ती असून ती आपलीच आहे.तेव्हा कोण्हीही कोणत्याही प्रकारचे नुकसान करता कामा नये.असे आवाहन, "भारत बंद निर्माण करो निर्माण संमती"संलग्न सातारा जिल्हा  क्रांती मोर्चा संयोजक समितीने केले आहे.
       एन.आर.सी.(राष्ट्रीय नागरिकता रजिष्टर) व सी.ए.ए.(नागरिकत्व संशोधन कायदा)  केंद्र सरकारने लादला असल्याने मोर्चानंतर आता पुढील टप्पा जाहीर केल्याप्रमाणे बंदबाबत येथील झेडपी जवळील सभागृहात बहुजन क्रांती मोर्चातर्फे अंतिम आढावा घेण्यासाठी  संयोजक समितीची आयोजित केलेल्या सहविचार सभा संपन्न झाली..अध्यक्षस्थानी प्रा.अर्जुन ओहळ होते.
      आतापर्यंत विविध संघटनेच्यावतीने सातारा येथेही अनेकवेळा निघालेल्या  रॅलीने वातावरण ढवळून निघाले आहे.त्याचीच पुढील बाजू म्हणून शांततेने बंद करायचे ठरले आहे.
      अमोल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शाहीर प्रकाश फरांदे,शाहिर मनोहर पवार,शाहिर माधव भोसले,माणिक आढाव, राफीकभाई,अनिल वीर,साबळे,भोसले,कांबळे, मनोहर सावंत, विविध संघटना यांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.बंद यशस्वी करण्यासाठी सर्व समाजघटकांनी योगदान द्यावे.अधिक माहितीसाठी - ७३८७७५६४९२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

*फोटो*: प्रकाश गवळी,नरेंद्र पाटील व व्यापारी मंडळांना निवेदन सादर करताना अमोल बनसोडे व समितीचे कार्यकर्ते.

Post a Comment

0 Comments