पाणीचोरी विरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्कआनेवाडी: गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळविणार्या टी अॅन्ड टी इन्फ्रा कंपनीला पाठीशी घालणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच चोरलेल्या पाण्याची मोजदाद करून त्यावर होणारा दंड टी अॅन्ड टी इन्फ्रा व आनेवाडी जलसंपदा कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्याकडून वसूल करावा व कायमस्वरूपी कारवाई करून शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी संघटनेच्या स्टाइल ने आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर भोसले यांनी दिला आहे
जलसंपदा विभागाच्या आनेवाडी येथील स्थानिक शेतकर्यांनी टी अॅन्ड टी इन्फ्राच्या सिमेंट मिक्सर प्लांटसाठी धोम उजव्या कालव्यातून पाणी चोरी होत असल्याची माहिती सतत दिली जात होती. परंतु, वर्षभरात जागेची पाहणी तर सोडाच पण साहित्य जप्ती किंवा दंडात्मक कारवाई झाली नाही.
संबंधित कर्मचारी अधिकारी तिकडे फिरकले नाहीत. त्यामुळे या जलसंपदा कार्यालयांच्या सहमतीनेच हा सर्व प्रकार सुरु असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागेची पाहणी केली असता पाईप रस्त्यावरुन मुजवून नेल्याचे दिसत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यामधे लक्ष घालून या कंपनी सह जलसंपदा कार्यालयातील कारवाईस टाळाटाळ करणार्या भ्रष्ट अधिकार्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या करण्यात आली आहे
कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे आनेवाडी कार्यालयातील शाखा अभियंता यांनी सोमवारी रोजी कारवाई करु, असे सांगितले असून सर्व शेतकरी मोठ्या संख्येने आनेवाडी कार्यालयात येवून संबंधित अधिकारी शाखा अभियंता यांना पाणी चोरी बाबत जाब विचारणार आहेत.
कारवाई न झाल्यास जलसंपदा विभागाच्या आनेवाडी कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचे कमलाकर भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी गप्प का?
शेतकर्यांच्या हक्काचे पाणी पळविणार्या टी अॅन्ड टी इन्फ्रा च्या विरोधात शेतकर्यांना च पुढाकार घ्यावा लागत असून शेतकर्यांच्या मतावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र अजूनही गप्प आहेत, तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील डोळ्यावर पट्टी बांधून बसले असून ते देखील यात सहभागी आहेत का, अशी चर्चा आहे.

0 Comments