सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पुसेगाव: पाऊसकाळ समाधानकारक होऊनसुद्धा नेर धरणातील कॅनॉलचे पाणी वारंवार मागणी करून देखील पाटबंधारे विभाग सोडत नाही. पाटबंधारे विभागाला या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याने शिवसेनेने गनिमी कावा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत माहिती देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव म्हणाले, कॅनॉलची डागडुजी पूर्ण होऊन एक महिना झाला. या कालव्याद्वारे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येतं कायमस्वरूपी दुष्काळी असलेला भाग यावेळी वरुणराजाच्या कृपेने पाऊस चांगल्या प्रमाणात झाला आहे.
नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे तरीसुद्धा पाटबंधारे विभागाच्या निष्क्रिय कारभाराने पिके सुकण्याची वेळ आली आहे. डिसेंबर महिन्यात सुटणारे पाणी दोन महिने झाले तरी शेतकर्याच्या बांधला गेले नाही. जिहे-कटापूरचे राहिले हे हकाच आहे ते तरी वेळेवर द्या. शेतकरी वर्गातून याबद्दल तीव्र नाराजी आहे येणार्या सोमवारपर्यंत कॅनॉल चे पाणी सोडण्यात यावे अन्यथा, शिवसैनिक स्वतः नेर धरणाची पाणी दारे खुली करतील त्याची पूर्ण जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्याची असेल, असे प्रताप जाधव सांगितले.
या वेळी तालुका प्रमुक दिनेश देवकर, आमिन आगा, तालुका संघटक यशवंत जाधव, महिपती डंगारे, अनिल किर्वे, मुघटरव कदम, आकाश जाधव, आसाम शिकलगार, सचिन गुजर, रामदास जगदाळे, मिथुन गवळी, तुषार सावंत, गणेश जठार, अजित पाटेकर व शेतकरी उपस्थित होते.

0 Comments