कुडाळ
- कै.लालसिंगराव शिंदे व कै. राजेंद्र शिंदे यांच्या स्मृतीस्थळाचे
भूमीपूजन करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे
प्रतापगड साखर कारखान्यावर सहकारमहर्षींच्या स्मृतीस्थळाचे भूमीपूजन
आनेवाडी(प्रतिनिधी)
- माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे हे
पिता पुत्र एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत
नसत. त्यांनी प्रतापगड कारखाना उभारला, सहकारी पतसंस्था, काढल्या. या
संस्था अत्यंत शिस्तबद्धपणे त्यांनी चालविल्या. त्यांचा लोकसंग्रह मोठा
होता, आयुष्यभर त्यांनी माणसे जोडली. या दोन्ही पितापुत्रांनी अत्यंत
जोमाने आणि आत्मविश्वासाने विधायक कामे केली, त्यांचे सहकार क्षेत्रातील
कार्य मोलाचे असून ते पुढील पिढीने आत्मसात करावे असे भावनिक मत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी बोलताना
व्यक्त केले.
माजी आमदार कै.लालसिंगराव
शिंदे व कै. राजेंद्र शिंदे यांच्या स्मृतीस्थळाचा भूमीपूजन समारंभ
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांच्या प्रमुख
उपस्थितीत प्रतापगड कारखाना स्थळी संपन्न झाला. आपल्याबरोबर 30 वर्षे काम
केलेल्या एका जुन्या ज्येष्ठ सहकार्याच्या स्मृतीस्थळाचे भूमीपूजन आज मी
करत असून यावेळी स्वगीर्य राजेंद्र शिंदे यांच्या अनेक स्मृती मनात जाग्या
होत असल्याची भावना श्री बाळासाहेब भिलारे यांनी व्यक्त केली. तसेच
स्वर्गीय काका व भैय्यासाहेबांचे स्मृतीस्थळ हे फक्त जावळी पुरते मर्यादीत न
राहता ते सातारा जिल्हायतील तरुणांना प्रेरणादायी ठरावे, अशी अपेक्षा
व्यक्त केली. जावळी सह त्यांनी संपुर्ण जिल्हायात सहकार व राजकीय क्षेत्रात
मोलाचे काम केले आहे. येणार्या पिढीला त्यांचे हे काम निश्चीतच प्रेरणा
देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
करताना पंचायत समितीचे उपसभापती व स्वर्गीय लालासिंगकाकांचे नातू सैारभ
शिंदे म्हणाले की, सहकारमहर्षी स्व.लालसिंगराव शिंदे व स्व. राजेंद्र शिंदे
यांचे जावळीच्या राजकारणात व सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान असून
त्यांच्या पाश्चात त्यांचे स्मृतीस्थळ व्हावे अशी तमाम जनतेची इच्छा होती.
त्यामूळे काकांच्या जयंतीदिनाचे अैचित्य साधून त्यांच्या स्मृतीस्थळाचे
भूमीपूजन श्री भिलारे दादा यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या
साक्षीने करण्य़ात आले आहे. भिलारे दादा व भैय्यासाहेब हे दोघे जवळपास
अर्धेशतक राजकारणात व समाजकारणात सतत सोबत होते. परस्परांच्या कार्याचे ते
साथीदार आणि साक्षीदार होते. शरद पवार साहेबांच्या राजकीय व सामाजिक
विचारांशी एकनिष्ठ राहून कै. काका व कै. भैय्यासाहेबांनी प्रचंड रचनात्मक
काम केले. त्यांचेच संस्कार घेऊन मी राजकारणात आलो, राजकीय सत्तेचा वापर
अधिकाधिक रचनात्मक, विधायक लोककल्याणकारी कामासाठी केला पाहिजे हाच विचार
जपण्याचे काम मी त्यांचा वारसदार म्हणून करित राहीन. कमी वेळेत दर्जेदार
स्मृतीस्थळ ऊभे राहील अशी ग्वाही देत जनतेने प्रेम आणि जिव्हाळा कायम
ठेवावा एवढीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सुरूवातीस
प्रतापगड कारखाना कार्यस्थळावर स्मृतीस्थळाचे भूमीपूजन श्री. भिलारे
यांच्यासह ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे
सदस्य विजयकुमार सुतार, माजी सभापती मोहनराव शिंदे, बाजार समितीचे सभापती
राजेंद्र शिंदे, कारखान्याचे उपाध्यक्ष दादा फरांदे, संचालक जितेंद्र
शिंदे, मालोजीराव शिंदे, रविंद्र परामणे, बुवासाहेब पिसाळ, बाळासाहेब निकम,
संचालिका सैा.शोभाताई बारटक्के,मोहनराव कासुर्डे,बाळासाहेब निकम यांच्यास
कारखान्याचे संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments