रायगावनजीक शेती पाण्याचा विनापरवाना उपसा
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
आनेवाडी
जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी दिवस रात्र धावपळ करावी लागत असताना विकास कामाच्या नावाखाली शेतीच्या पाण्याचा गैरवापर होताना दिसत असून सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर च्या कामासाठी शेतकऱ्यांसाठी फक्त शेतीच्या वापरा साठी उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा वापर अनधिकृत पणे पुणे येथील टी अण्ड टी इन्फ्रा प्रा. लि या कंपनीकडून विनापरवानगी होत असल्याचे दिसून आले आहे
जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी दिवस रात्र धावपळ करावी लागत असताना विकास कामाच्या नावाखाली शेतीच्या पाण्याचा गैरवापर होताना दिसत असून सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर च्या कामासाठी शेतकऱ्यांसाठी फक्त शेतीच्या वापरा साठी उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा वापर अनधिकृत पणे पुणे येथील टी अण्ड टी इन्फ्रा प्रा. लि या कंपनीकडून विनापरवानगी होत असल्याचे दिसून आले आहे
सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरच्या कोटयावधी रूपयाचे कामाचे टेंडर
पुणे येथील टी अण्ड टी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाले असून
काम पूर्ण करण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षा पासून जास्त काळ छुप्या
पद्धतीने धोम धरणाअंतर्गत येणाऱ्या उजव्या कालव्यातून रायगाव ता. जावली
गावच्या जवळ विनापरवानगी शेतीचे पाणी वापरले जात आहे कालव्या मधे काळ्या
रंगाची पाईप टाकली असून ति रस्त्यावरुन दिसू नये या करिता त्यावर खड़ी आणि
ग्रिट टाकून मुजविण्यात आली आहे,रायगाव ता. जावली या ठिकाणी या कंपनीचे
सिमेंट मिक्सर चा प्लांट गेल्या वर्षभरा पासून उभारण्यात आला आहे त्यासाठी
लागणारे पाणी या कंपनी कडून जलसंपदा विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता
गेल्या महिन्यात व आता देखील शेतीच्या पाण्याची चोरी घटनास्थळी स्थानिक
शेतकऱ्यांनी पाहणी केली असता दिसून आली,
संबंधित शेतकऱ्यांना पाणी उपसण्याची परवानगी घेण्यासाठी वारंवार
जलसंपदा विभागात आपल्या चपला झिजवाव्या लागतात प तरीदेखील परवानगी
मिळण्यासाठी विलंब होत असतो परंतु नुकत्याच सुरू झालेल्या या सिमेंट मिक्सर
प्लांट साठी परवानगी कशी मिळाली याचा प्रश्न स्थानिक शेतकर्यांना पडला
होता परंतु जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेता रात्रीच्या वेळी
सुद्धा व दिवसाढवळ्या देखील पाण्याची चोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले,
सातारा शहराचा विकास करीत असताना आधीच सातारकर जनता ट्रॅफिक जाम ग्रेड
सेपरेटर च्या कामातून होणारे कर्कश्श आवाज हवा प्रदूषण याने त्रस्त असताना
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देखील याचा त्रास होत असताना दिसत आहे
एकीकडे विकास कामाच्या नावाखाली गाजावाजा होत असताना मात्र
शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार असून आधीच शेतकरी हमीभाव व
पाण्याच्या कमतरतेमुळे हवालदिल असताना या हिवाळ्याच्या दिवसात पिकाला पाणी
देण्यासाठी थंडीत देखील धडपड करीत आहे परंतु या कंपनीकडून कोणत्याही
प्रकारची पूर्वपरवानगी न घेता कालव्यातून पाण्याचा उपसा केला जात आहे
डोंगराच्या बाजूला असणाऱ्या या प्लांट कडे कोणाचे लक्ष जात नाही याचाच
फायदा घेऊन संबंधिताकडून पाण्याची चोरी केली जात आहे जलसंपदा विभाग
यांच्याकडे असणाऱ्या आनेवाडी येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील
अधिकाऱ्यांनी देखील आमच्याकडे कोणतीही परवानगी साठी अर्ज आला नसल्याचे
सांगितले यातूनच जिल्ह्यातील नेत्यांच्या नावाखाली खुलेआम गैरप्रकार चालू
असल्याचे उघड झाले शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींना
आता तरी जाग येणार का?शहरात काम करणाऱ्या या कंपनीवर कायदेशीर मार्गातून
कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
घटनास्थळी शेतकरी गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी यातून आनेवाडी येथील
शाखा अभियंता पिसाळ यांना याची माहिती आहे त्यांना विचारुनच पाणी घेत
असल्याचे सांगितले मात्र, संबंधित शाखा अभियंता यांना फ़ोन वरुन विचारले
असता कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगितले, गेल्या महिन्यात
देखील पाणी विनापरवानगी व कोणतीही सूचना जलसंपदा विभागा च्या आनेवाडी
येथील कार्यालयला न देता वापर करून घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले
गेल्या वर्ष भरापासुन होत असलेल्या पाण्याची चोरी वर दंड झाला पाहिजे व
कारवाई देखील झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत असून वर्ष भरा
पासुन वापरलेल्या पाण्याची मोजदाद जलसंपदा विभागाला करावी लागेल,अन्यथा
शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे
जलसंपदा विभागाची परवानगी नसल्याचे उघड,शेतकरी संघटना आवाज उठविणार का?
गेल्या वर्षी देखील कालव्यात सोडलेल्या पाण्याची चोरी करण्यात
आली असल्याचे दिसून आले त्यावेळी सदर कंपनीला तोंडी ताकीद देण्यात आली होती
व पाण्याचा वापर करावयाचा असल्यास परवानगी घेण्यासाठी सांगण्यात आले परंतु
त्यावर दंड आकारणी अथवा कारवाई देखील करण्यात आली न्हवती,पुन्हा एकदा
पाण्याची चोरी होत असताना दिसून आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या साठी आवाज
उठवणाऱ्या शेतकरी संघठना आता यावर आवाज उठवणाऱ का?
जलसंपदा विभागाला आर्थिक रसद मिळत असल्याचे चर्चा
आनेवाडी
येथील कार्यालया पासून जवळच हा प्लांट असून तरी देखील कालवा निरीक्षक अथवा
इतर कोणता ही कर्मचारी यांचे याकडे दुर्लक्ष कसे हा प्रश्न स्थानिक
शेतकऱ्यांना पडला असून, जलसंपदा विभाग व टी अँड टी कंपनी मधे आर्थिक
देवाण-घेवाण होत असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत
धोम कालव्यातून विना परवानगी शेतीचे पाणी चोरी करण्यासाठी टाकलेली पाईप,व पाणी साठविण्यासाठी तयार केलेला हौद



0 Comments