Hot Posts

6/recent/ticker-posts

चिकन, मटण शॉप सुरु ठेवणाऱ्यावर फलटणला गुन्हा

फलटण ; अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवा असा जिल्हाधिकारी यांचा आदेश असताना त्या आदेशाचे उल्लंणघन करून स्वतःच्या फायद्याकरिता मटण व चिकन दुकान सुरू ठेवले व गर्दी केल्याने येथील दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       या बाबत तक्रारदार गणेश मधुकर यादव पोलीस कॉन्स्टेबल यांच्या तक्रारीवरून शनिवार   दि.21.3. 2020 रोजी 9.20  वा. चे सुमारास फर्स्ट क्लास कॉलिटी मटण शॉप खाटीक गल्ली रविवार पेठ फलटण येथे महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रतिबंध आपत्ती व्यवस्थापन चालू असल्याने  जिल्हा दंडाधिकारी सातारा यांचेकडील आदेश क्रमांक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय सातारा क्रमांक ने आ/ कावी / 646/ 2020 दिनांक 19.3. 2020 रोजी जारी केले आहेत तारीख 21 .3 .2020 रोजी फिर्यादी व पो .कॉ .1633 यादव असे बिट मार्शल पेट्रोलिंग करीत असताना फर्स्ट क्लास कॉलिटी मटण शॉप खाटीक गल्ली रविवार पेठ फलटण येथे 1.अमोल मनोज सरगर 2. सागर मनोज सरगर दोन्ही राहणार खाटीक गल्ली कुंभार टेक  फलटण यांनी आदेशाचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्याकरिता मटण व चिकन विक्री करणे करिता लोकांची गर्दी केली असताना मिळून आले म्हणून भा.द.वि. कलम 188 प्रमाणे वरील दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोईटे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments