![]() |
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क / कुकुडवाड
माण तालुक्यातील
कुकुडवाड(कारंडेवाडी) येथे घरगुती वादातून पुतण्यानीच चुलत्याचा सुरीने
गळ्यावर सपासप वार करून झोपलेल्या जागीच निर्घृण खून केल्याची घटना आज
सकाळी घडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीं संदीप वसंत चव्हाण हा फरारी
आहे.पोलिस आरोपीचा कसून तपास करत आहेत. लक्ष्मण अण्णा चव्हाण असे खून
झालेल्या व्यक्तीच नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी
कि मयत लक्ष्मण चव्हाण, आरोपी संदीप चव्हाण आणि त्याचे वडील वसंत चव्हाण
हे सर्वजण एकाच कुटुंबात राहत होते.यातील मयत व आरोपी यांच्यात सतत दारू
पिऊन वादातून त्यांच्यात अनेकवेळा मारहाण झाली होती. रात्री सर्वजण जेवण
करून झोपली असता संदीप याने दारूच्या नशेत घरासमोर झोपलेल्या आपल्या
चुलत्याच्या गळ्यावर सुरीने सपासप वार करून तेथून पळ काढला.लक्ष्मण यांना
खोलवर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला.
सदर
घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी घाव घेऊन आरोपीस
शिवारात शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेचा पंचनामा करून आरोपी विरूद्ध
मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटना स्थळी पोलीस उपअधीक्षक बी. बी.
महामुनी यांनी भेट देऊन आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा असे सांगण्यात
आले.सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे करत आहेत.


0 Comments