फलटण :- येथील जाधववाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आरोग्य सेविकीच्या संपर्कातील १० निकट व ३५ दूरस्थरीत्या संपर्कात व्यक्ती आढळून आल्या होत्या.त्या निकट संपर्कात व्यक्तींपैकी ७ व्यक्तींचे प्रथम अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 3 अहवाल प्रलंबित आहेत. निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून दूरस्थरीत्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरण करण्यात आले आहे.
रविवार सायंकाळ अखेर ४२३ व्यक्ती गृह विलगीकरण आहेत ज्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. विलगीकरण कक्ष येथे विलगीकरण मध्ये ४८ व संस्थात्मक विलगिकरण मध्ये ११ व्यक्ती आहेत. याचबरोबर दि ९ रोजी जेजुरी येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील निकट संपर्कात फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका व्यक्तीला सिव्हील हाॅस्पीटल सातारा येथे स्वॅप घेण्यासाठी पाठवण्यात आला असून सदर व्यक्तींला नियमित डायलिसीस आवश्यक असल्याने फलटण येथे ठेवण्यात आले नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली आहे.
0 Comments