कोरेगाव तालुक्यातील कोरोना संशयीत,ब्रम्हपुरी येथील कोरोना केयर सेंटर मध्ये ठेवले जात आहेत.रहिमतपुर पालिकेचे कर्मचारी, कोरगांव तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी ,महसुल विभाग, यांचे देखरेखीखाली कोरोना केयर सेंटर चे कामकाज सुरु आहे.संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह ,आले तरी खबरदारीचा उपाय म्हणुन येथे क्वारंटाईन कलेले अनकजण आहेत.क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर अनेकांना आपआपल्या गावी घरी सोडण्यासाठी वैद्यकीय टीमसह,महसुल विभाग कार्यरत आहेत.
वीस दिवसांपुर्वी बुलढाणा जिल्हयात धार्मिक कामासाठी गेलल्या ५२ वर्षीय मुस्लीम गृहस्थ पायी चालत कोरेगाव तालुक्यातील गावात आढळल्याने तातडीने त्याला कोरोना केयर सेंटरमध्ये दाखल केले.त्याचे रिपोर्ट तपासणीत निगेटिव्ह आले.परंतु चौदा दिवस क्वारंटाईन कालावधी पुर्ण होईपर्यंत त्यांना कोरोना केयर सेंटर मध्ये ठेवण्यात आले.सध्या हा कालावधी संपला असुन त्यांना नक्की पाठवायचं कसं,कुठे हाच प्रश्न सध्या आरोग्य, विभाग,महसुल विभागाला पडला आहे.हे गृहस्थ बेळगाव जिल्हयातील असुन ता. रायबागअसल्याचे माहीती मिळते .या व्यक्तीला घरी पाठवण्यासाठी रहिमतपुर पालिकेने प्रयत्न करत सातारा एस टी आगारातदेखील कळवले असुन एकाच प्रवाशासाठी एस टी ने असर्मथता दाखवली.कोरोना संकट गडद होत असताना येणाऱ्या कालात परिस्थिती गंभीर होण्याची भिती आहे .दरम्यान या व्यक्तीच्या माहीतीवरुन त्याला गावी पोहचवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने केला असता हातकणंगले येथुन त्याव्यक्तीस परत पाठवल्याचे समजते.सध्या या व्यक्ती ची सर्व काळजी संबधीत यंत्रणा घेत असुन पन्नास बेडची सुविधा असणाऱ्या या कोरोना केयर सेंटरमध्ये वाढणारे रुग्ण चिंतेचा विषय असताना बरे असणाऱ्यालया व्यक्तीचं करायचं काय असा प्रश्न संबधीत यंत्रणेला पडला आहे.
0 Comments