सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
भेकवली: दिवसेंदिवस शहराभोवती घट्ट होत चाललेला कोरोनाचा विळखा व स्थानिक रोजगार चालू करण्यासंदर्भात समन्वय साधण्याचा दृष्टीने करावयाच्या उपाय योजना संदर्भात १० रोजी महाबळेश्वर नगरपालिकेच्या सौ.स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी श्रीमती पल्लवी पाटील अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची अति तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेपुढील विषयामध्ये प्रामुख्याने १)महाबळेश्वर शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाय योजना करण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे. २)संपूर्ण देशात अनलॉक चार ची प्रक्रिया सुरू आहे. तरी महाबळेश्वर शहरात देखील पर्यटकांची आवक सुरू झाली आहे. तरी खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे. ३) वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाबळेश्वर शहरामध्ये कोरोना केअर सेंटर रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा करण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे आदी विषयांचा समावेश होता . अनलॉक ४ च्या अनुषंगाने सध्या महाबळेश्वर शहरामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. वाढत्या गर्दी सोबत शहर परिसरामध्ये कोरोनाचे थैमान देखील दिवसेंदिवस वाढतच आहे.त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांपासून पर्यटकांविन बंद पडलेले उद्योग व्यवसाय चालू करण्याबरोबर स्थानिक नागरिक व पर्यटकांचे आरोग्य सांभाळून पर्यटन व्यवसाय चालू करणे ह्या अति महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय होणे गरजेचे होते . त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महाबळेश्वर येथील कोरोना केअर सेंटर मध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सीजन बेड ची गरज केव्हा ही निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने त्वरित उपाय योजना करणे अति महत्त्वाचे असताना देखील ऑनलाईन मिटिंग करणे आम्हाला जमत नसल्याने ऑफ लाईन मिटिंग करा असे कारण पुढे करीत सतरा पैकी तब्बल बारा नगरसेवकांनी आजच्या अतितातडीच्या सभेला दांडी मारल्यामूळे अगोदरच आर्थिक विवणंचनेत सापडलेल्या स्थानिक जनतेमध्ये या बारा नगरसेवकांबद्दल संभ्रमावस्था झालेचे पहायला मिळत आहे. वास्तविक पाहता गावचे हित डोळ्यापुढे ठेवून सर्वानुमते सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित असताना तसे न होता चक्क सभाच तहकूब झाल्याने भविष्यामध्ये ह्या पर्यटन पंढरीला पुन्हा पूर्वी सारखे सोनेरी दिवस येतील का? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.
आगामी निवडणुकीत धडा मिळेल
" महाबळेश्वर नगरीविषयी असंवेदनशील असलेल्या या बारा नगरसेवकांना महाबळेश्वरची जनता आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपली जागा निश्चितच दाखवेल !
-कुमार गोरखनाथ शिंदे, नगरसेवक महाबळेश्वर.

0 Comments