सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण: ढेबेवाडी विभागातील डाक8ूेवाडी (काळगाव) येथील कलावंत डॉ. संदीप डाकवे यांनी पेपर कटिंग आर्ट कलाकृतीच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र साकारत त्यांना जयंतीदिनी अभिवादन केले आहे. यापूर्वी त्यांच्या कलेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, हायरेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. डाकवे यांच्या अभूतपूर्व यशामुळे डाकेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
नेहमी विविध चित्रे रेखाटत असताना काही तरी वेगळे करण्याच्या भावनेतून त्यांनी पेपर कटिंग आर्ट मधून चित्रं तयार केली आहेत. रांगोळी, पोट्रेट पेंटिंग, वॉल पेंटिंग, व्यंगचित्रे, शब्दचित्रे, अशा चित्रकलेच्या विविध माध्यमात काम करत असताना डाकवे यांनी पेपर कटिंग आर्ट कला आत्मसात केली आहे. त्या माध्यमातून ते पोट्रेट साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. पेपर कटिंग आर्टमधून त्यांनी यापूर्वी लोकनेते बाळासाहेब देसाई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चित्रे तयार केली आहेत.

0 Comments