सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: टंचाई काळात पाण्याचा अपव्यय झाल्याप्रकरणी 48 तासांत अहवाल देण्याचे आदेश असतानाही माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी प्रांत शैलेश सूर्यवंशी यांच्या आदेशला कोलदांडा दाखवला. दहा दिवसांनंतर प्रांतांना पुन्हा त्यासाठी स्मरणपत्र पाठवावे लागल्याने तहसीलदारांच्या मनमानी कारभाराविरोधात माण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. तर हतबल प्रांत आणि मस्तवाल अधिकार्यांच्या अन्यायाने पालकमंत्र्यांनी मोकळ्या गप्पा न मारता कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी, माण तालुक्यात बहुतांश भागातील जनता तीव्र पाणी टंचाईला सामोरी जात आहे. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये अनेक गावांमधून टॅकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल असून, मे महिन्यातही टॅकरचा पत्ता नाही यासाठी तालुका प्रशासन आणी जिल्हा स्तरावरती पालकमंत्र्यांनी टंचाईच्या बैठका घेत केलेल्या भीमगर्जना या मोकळ्या गप्पा नाहीत काय? असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी उपस्थित केला आहे.
टंचाई काळात पाणी देणं सोडाचं परंतु असणारं जे काही उपलब्ध पाणी जमिनीवरती मोकळं सोडणारे जि.प.चे कर्मचारी याबाबतची लेखी तक्रार मा.उपविभागीय अधिकारी माण यांचेकडे दाखल झालेली असून. याबाबत प्रांत शैलेश सूर्यवंशी यांनी तहसीलदार माण, गटविकास अधिकारी माण, उपअभियंता पाणी पुरवठा माण यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करुन दि. 26 एप्रिल 2022 चे आदेशाने 48 तासांत या गभीर गुन्ह्याची चौकशी करुन पुराव्यांसहित अहवाल सादर करणेचे आदेश दिलेले होते.
या आदेशाला दहा दिवस म्हणजेच दोनशे चाळीस तास उलटून निघाले तरी याबाबतचा अहवाल प्रांत कार्यालयामध्ये अद्यापही पोहचू शकला नाही. हा टंचाई काळात संबंधित अधिकार्यांचा बेजबाबदारपणा नाही काय ? असा प्रश्न करतानाच अशा कर्तव्यात कुसुर करणार्या आणी संबंधित गावाला अजून पाणी टंचाईत लोटणार्या मस्तवाल अधिकार्यांवरती मा.प्रांतसाहेब, मा.जिल्हाधिकारी सो, आणी मा.पालकमंत्री साहेब कोणती कारणाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असे भोसले म्हणाले.
गावेच्या गावे पाण्यासाठी टाहो फोडत असताना,जनतेची वनवण थांबवायचे सोडाच परंतु कागदी घोड्यात टॅकर अडकविणारे मस्तवाल कर्मचार्यांवरती वरीष्ठ अधिकार्यांचा अंकुश उरलेला दिसून येत नाही, असे भोसले यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment