सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले :
गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त हजारो भाविक येत असतात. त्यामुळे वाहतुकीचे योग्यरीत्या नियोजन करण्याकरिता गोंदवलेकडील जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा अजयकुमार बन्सल यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार १३जुलै २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजलेपासून ते सायंकाळी ८:०० वाजेपर्यंत दहिवडी म्हसवड मार्गावर रहदारीचे प्रमाण सर्वाधिक असते आणि अपघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.
सातारा ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवरील पिंगळी बुद्रुक गावचे हद्दीतील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक गावातील आप्पा महाराज चौकापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. साताऱ्यावरून पंढरपूर, अकलूजकडे जाण्याकरता पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीतील खांडसरी चौक ते दहिवडीमार्गे रानंद, मार्डीवरून म्हसवडमार्गे रोड खुला करण्यात आलेला आहे. तसेच खांडसरी चौक ते दहिवडीमार्गे र मार्डीवरून म्हसवडमार्गे पंढरपूर व अकलूजकडे जाणारा रोड असा पर्यायी मार्ग खुला करून वाहतूक वळवली आहे. तसेच पंढरपूरकडून साताऱ्याकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणीमार्गे सातारा अथवा म्हसवड ते शिंगणापूर फलटण मार्गे सातारा असं वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल,
-सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी संतोष तासगावकर
0 Comments