Hot Posts

6/recent/ticker-posts

मार्डी तील सर्व विधवा महिलांना धार्मिक कार्यात मिळणार सन्मानाची वागणूक: सुनीता मोरे

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कुकुडवाड:  आज  मार्डी येथे ग्रामपंचायत मार्डी याच्या वतीने महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.यामध्ये सोनाली पोळ ,सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प.सातारा.तसेच भारती पोळ जि.प.सदस्य, सातारा उपस्थित होत्या. विधवा प्रथा बंदीवर बोलताना सुनीता मोरे मॅडम म्हणाल्या विधवा  साठीच्या असलेल्या रूढी परंपरा महिलांनीच सुरू केल्या आहेत .तर बंद करण्यासाठी  पण महिलाच पुढाकार घेतील.हळदी कुंकू असेल किंवा हिरव्या बांगड्या असतील किंवा हिरवी साडी असेल लग्नापूर्वी सुद्धा मूली या गोष्टी सन्मानाने वापरतात.त्याचा संबंध फक्त पतीशी नाही.त्यामुळेच पतीच्या निधनानंतर या आपुलकीच्या  वस्तूंपासून ती वंचित राहता कामा नये त्या वस्तू तितक्याच सन्मानाने त्यानी वापराव्यात. धार्मिक कार्यात तीला सन्मानाची वागणूक ममिळावी.आणि सर्वानी तीला माणुसकी पदाची वागणूक द्यावी तरच आजचा विधवा प्रथा बंदीचा ठराव खर्या अर्थाने सार्थक होईल.सुनिता मोरे यांनी सर्व महिलांनी मिळून विधवा प्रथा बंदीबाबत सामुदायिक शपथ घेतली.सर्वानी त्यास उस्फूर्त प्रतिसाद दर्शविला. कार्यक्रमात सोनाली पोळ यांनी सर्व विधवा महिलांना हिरवा चुडा. भरला.तर भारतीताई पोळ यांनी हिरवी साडी चोळी देऊन  हळदीकुंकू लावून सन्मान केला.या कार्यक्रमासाठी सरपंच संगीता दोलताडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होत्या. मार्डी वि.का.स.सोसा. च्या सर्व महिला सदस्य. अंगणवाडी ताई,महिला शिक्षिका,उमेद अभियान बचत गटाची सर्व कार्यकारिणी मंडळी हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता मोरे मॅडम यांनी केले.तर आभार संजीवनी पवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments