सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: किल्ले अजिंक्यतारा येथील जुन्या कडावरुन पाय घसरुन एक वृद्ध दरीत पडला. यांची माहिती मिळताच पोलीस व शिवेंद्रराजे ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झालेे. युद्धपातळीवर बचाव कार्य करून वृद्धाला बाहेर काढण्यात यश आले आहे. हणमंत जाधव (वय 64, रा.वडगाव पुणे) असे त्यांचे नाव आहे. ते बेपत्ता झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल आहे.
पोलिसांनी ाजदलेली मााजहती अशी, वडगाव बुद्रुक येथील रहिवाशी हणमंत जाधव हे बेरू कंपनीत जनरल मॅनेजर पदावरून सेवा निवृत्त झाले होते. त्यांना दारूचे व्यसन असून दारूच्या नशेत ते शुक्रवार दि. 5 रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाले. यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी शोध सुरू केला. दिवसभर शोधून ही ते मिळून आले नाहीत. यामुळे याची तक्रार पुणे येथील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल झाली. यावेळी नातेवाईकांनी घरी येऊन त्याचे फोन तपासले. यामध्ये सातारा येथील एका बँकेच्या एटीएम मधून 500 रूपये काढल्याचे निदर्शनास आले. यामुळे नातेवाईकांनी सातार्याला धाव घेत शोध सुरू केला. तोच शनिवारी सकाळी किल्ले अजिंक्यतारा येथे फिरायला येणार्या नागरिकांना एक वृद्ध दरीत पडल्याचे निदर्शनास आले. यांची माहिती पोलिसांना मिळताच शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने बचाव कार्य सुरू झाले. यावेळी हे हणमंत जाधव असल्याचे नातेवाईकांनी ओळख पटवून सांगितले. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. ते सुखरूप असून पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
.jpg)
0 Comments