सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: खेळायला जातो म्हणून घरच्यांना सांगून गेलेली दोन अल्पवयीन मुले घरी परत न आल्याने व शोध घेऊन देखील न सापडल्याने अज्ञाताने त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरती अरुण जाधव ( वय 40 वर्षे रा. महतपुरा पेठ, मलठण ता. फलटण) यांनी यांनी फिर्याद दिली. गुरुवार दि. 4 ऑगस्ट रोजी शाळेतून आल्यानंतर फिर्यादी यांचा मुलगा ओमकार जाधव ( वय 14 वर्ष इयत्ता 9 वी मुधोजी हायस्कूल फलटण ) व पुतण्या अर्जुन राजेंद्र जाधव ( वय 15 वर्ष इयत्ता 10 वी प्रेमलताताई हायस्कुल फलटण) हे दोघे शाळेतून आल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजणेच्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर गेली. बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नाहीत म्हणून शेजारी आसपास मलठण व फलटण शहरात मुलांचा शोध घेतला. रात्री पाऊस असल्याने मुले सकाळ पर्यत माघारी येतील म्हणून वाट पाहिली पण मुले आली नाहीत. पै - पाहुणे यांच्याकडे मुलांचा शोध घेतला परंतू ती आढळून आली नाहीत. मलठण, फलटण गावच्या हद्दीतून कोणीतरी अज्ञात इसमाने दोघांना अज्ञात पळवुन नेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments