Hot Posts

6/recent/ticker-posts

मायणी ब्रिटिशकालीन तलावात बुडून युवकाचा मृत्यू


मायणी :- प्रतिनिधी तानाजी चव्हाण 
येथील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन तलावात पर्यटनासाठी गेलेल्या एका युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.यामुळे सर्वत्र खळबळ झाली आहे.                               याबाबत मायणी पोलीस दुरक्षेत्र येथून मिळालेली माहिती अशी,सूर्यप्रकाश मदनलाल बनकर (वय वर्ष वीस) सध्या राहणार मायणी मूळ -रा. दोडसर ता.चौमु,जि. जयपूर,राजस्थान हा युवक फरशी कामानिमित्त मायणी येथे वास्तव्यास राहत होता. आज पर्यटनासाठी मायणी ब्रिटिशकालीन तलाव परिसरात गेला असता सदर इसम हा फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरला ,मात्र काल झालेल्या जोरदार पावसाने तलावाची पाणी पातळी वाढली होती.त्याठिकाणी पाणी खोल असल्याने पाण्यात बुडाला आहे.अशी माहिती पोलिस पाटील प्रशांत कोळी यांना कळताच त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर व कॉन्स्टेबल अजित काळेल,कॉन्स्टेबल प्रदीप भोसले ,होमगार्ड किरण घाडगे,पोलीस पाटील प्रशांत कोळी घटनास्थळी पोहचले. मात्र सदर युवक घटनास्थळी आढळून न आल्याने मायणी गावातील रहिवासी महेश सूर्यवंशी,सुरज सूर्यवंशी ,रवी सूर्यवंशी ,मंजूर रोहिते , विशाल सुर्वे ,दिलीप सूर्यवंशी यांना बोलून त्यांचे  मदतीने सदर युवकाचा पाण्यात शोध घेतला अनेक प्रयत्नाने त्याला पाण्याबाहेर काढण्यात सर्वांना यश आले.परंतु सदर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृत युवकाचे शवविच्छेदन कारण्यासाठी कलेढोण याठिकाणी पाठवण्यात आले.याबाबत मयताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भूषण माने करत आहेत.

Post a Comment

0 Comments