जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण केल्याचे समाधान - डॉ दिलीपराव येळगावकर - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 17, 2022

जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण केल्याचे समाधान - डॉ दिलीपराव येळगावकर


घाडगेवस्ती कॅनॉल रस्ता मुरुमीकरनास प्रारंभ
मायणी : प्रतिनिधी  तानाजी चव्हाण
गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी बांधवांना दळणवळणासाठी त्रासदायक झालेल्या रस्त्याची अखेर दुरुस्तीसाठी मंजूरी कामाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आम्ही केला आहे.२०१७ ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेपुढे जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासन दिलेली सर्व कामे पूर्ण केल्याचे समाधान आहे,असे प्रतिपादन माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी मायणी येथील घडगेवस्ती ते विटा रस्ता कॅनॉल रस्त्याची दुरुस्ती व मुरुमीकरण कामाच्या शुभारंभा वेळी केले.
 यावेळी पाटबंधारे विभागाचे शिंदे  उपसरपंच जगन्नाथ भिसे,माजी उपसरपंच सुरज पाटील,आनंदराव शेवाळे, विजयराव कवडे,रघुनाथ माने दिलीप माळी,संभाजी देशमुख,माजी सरपंच शिवाजीराव माळी,जालिंदर माळी,मानसिंग देशमुख,सोमनाथ माळी,जनार्दन देशमुख, बाबुराव मोहिते,शिवाजी मोहिते,भिकाजी माळी यांचेसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 पुढे बोलताना डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी अतिशय त्रासदायक असणारा हा रस्ता लवकरात लवकर व्हावा या साठी आम्ही सिंचन विभागाकडे मागणी होती.त्या मागणी नुसार कार्यकारी अभियंता सौ.शिल्पा राजे व यांत्रिक विभागाचे काळमोरे,कार्यकारी अभियंता शेळके,जलसंपदा विभागाचे बनसोडे,सुभाष खाडे व  यांनी तात्काळ मायणी - विटा रस्त्यावरील मायणी कॅनॉलवरील कॅनॉल ते घाडगे वस्ती रस्ता दुरुस्ती  मुरमीकरण कामास तात्काळ मंजुरी दिली.लवकरच हा रस्ता डांबरीकरण करून घेऊ.असे आश्वासनही डॉ. येळगावकर यांनी उपस्थितांना दिले.
सदर वेळी माजी उपसरपंच सुरज पाटील,सोसायटी चेअरमन मोहन दगडे यांचीही मनोगते पार पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांचे आभार राजाराम कचरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment