फलटण:
जर आपण तालुक्यांचे राजकारण चांगल्यांच्या हातात दिले नाही तर पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही . खासदारांच्या कार्यपध्दतीनुसार तालुक्यातील आगामी काळात खासदारांच्या गटामध्ये खासदार स्वतः व त्यांचे बंधू समेशरसिंह ना . निंबाळकरच शिल्लक राहतील . त्यांचे बाकीचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील किंवा घरी बसतील असे म्हणत एक दुक्कल मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून असतात व तेथूनच जिल्ह्यातील व तालुक्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असतात असा टोला विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे ना . निंबाळकर यांनी खा . रणजितसिंह ना . निंबाळकर व आ . जयकुमार गोरे यांना लगावला.
जर आपण तालुक्यांचे राजकारण चांगल्यांच्या हातात दिले नाही तर पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही . खासदारांच्या कार्यपध्दतीनुसार तालुक्यातील आगामी काळात खासदारांच्या गटामध्ये खासदार स्वतः व त्यांचे बंधू समेशरसिंह ना . निंबाळकरच शिल्लक राहतील . त्यांचे बाकीचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील किंवा घरी बसतील असे म्हणत एक दुक्कल मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून असतात व तेथूनच जिल्ह्यातील व तालुक्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असतात असा टोला विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे ना . निंबाळकर यांनी खा . रणजितसिंह ना . निंबाळकर व आ . जयकुमार गोरे यांना लगावला.
फलटण
येथील एका मंगल कार्यालयात महादेव पोकळे व ईतर कार्यकर्ते यांच्या
राष्ट्रवादी प्रेवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ . दीपक चव्हाण ,
माजी जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना . निंबाळकर , श्रीमंत रघुनाथराजे
ना . निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे ना. निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ . रामराजे म्हणाले , राजकारणाच्या
तत्कालीन परिस्थितीनुसार तुम्ही पूर्वी वेगळे होता . जर आपण तालुक्यांचे
राजकारण चांगल्यांच्या हातात दिले नाही तर पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार
नाही. आता सद्य परिस्थितीमध्ये भाजपात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांच्यानंतर जर कोणी थोर नेते असतील तर ते म्हणजेच आ . जयकुमार गोरे असतील ,
असा टोला विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे ना . निंबाळकर यांनी खा .
रणजितसिंह ना . निंबाळकर व आ . जयकुमार गोरे यांना लगावला
जिल्ह्यात
काम करून घेण्याची पध्दत आपण सुरू केली. दिल्लीत गेल्यावर स्व . यशवंतराव
चव्हाण यांचा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याला ओळखले जाते. अशा या
जिल्ह्यामध्ये आता कोणत्या प्रकाराचे नेते तयार होत आहेत हे नागरिकांनी
उघड्या डोळ्यांनी पाहणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांना विकासाची व प्रश्नांची
जाण असली पाहिजे . गटात असावे किंवा नसावे पण सर्वसामान्यांची कामे
करण्यासाठी कायमच राष्ट्रवादी सर्वसामान्यांच्या पाठिशी उभी आहे .
तालुक्यातील खासदारांच्या कार्यपध्दतीनुसार तालुक्यातील आगामी काळात
खासदारांच्या गटामध्ये खासदार स्वतः व त्यांचे बंधू समेशरसिंह ना .
निंबाळकरच शिल्लक राहतील. त्यांचे बाकीचे कार्यकर्ते आपल्याकडे येतील किंवा
घरी बसतील , असा टोलाही रामराजेंनी खा . रणजितसिंह ना . निंबाळकर यांना
नाव न घेता लगावला. ते म्हणाले , मागील काही दिवसांपूर्वी आदरणीय गोरेसाहेब
म्हणत होते की , आता या उतरत्या वयात नातवंडांसोबत बसा, मी नातवंडांसोबत
बसू शकतो परंतु, मला त्यांना एक विचारायचे आहे की तुम्हाला मुल व संसार
किती हे स्पष्ट करा आणि मग नातवंडे किती हे सांगा , असाही टोला रामराजेंनी
लगावला.
खासदारांचा धंदा
एकच आहे तो म्हणजे नवं जुनं करणं आपल्या तालुक्यातील नागरिकांना माहित नसेल
पण किचनमधील मिक्सर किंवा अवजारे दुरूस्त करायचा डिप्लोमाचं कदाचित
माझ्याकडून डिप्लोमाच नाव चुकत असेल हे खासदारांच शिक्षण झालं आहे.
खासदारांचे शिक्षण कुठे झाले ? हे शोधावे लागेल. आता तालुक्यामध्ये
तडीपारीची केस फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांवर का ? सत्तेचा गैरवापर
करण्याचे काम सध्या चालू आहे . असे काही केले तरी व खासदारांनी कितीही
ठरवले तरी तालुक्यातील नागरिकांचे मनपरिवर्तन करण्यामध्ये खासदार कधीही
यशस्वी होणार नाहीत, अशी टीकाही रामराजेंनी खा . रणजितसिंह यांच्यावर केली.
सातारा
जिल्ह्याचे असल्या लोकांमुळेच नाव खराब होत आहे. गोरे व खासदार हे दुक्कल
मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून असतात व तेथूनच जिल्ह्यातील व
तालुक्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असतात . कोरेगावच्या कॉरिडॉर
एमआयडीसीचा निर्णय हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी घेतला
आहे. राज्याची व केंद्राची एमआयडीसी हे वेगळे प्रकल्प असतात. त्यामध्ये
म्हसवडलासुध्दा एमआयडीसी होवू शकते. फलटणला राज्याचीच एमआयडीसी आहे. परंतु ,
फलटणला आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू आहेतच ना ?, असेही रामराजे म्हणाले.
खासदार गटातला तो पट्ठ्या कोण?
राष्ट्रवादीतील
प्रवेशानंतर माझी जि. प सदस्य महादेव पोकळे यांनी बोलताना खासदार गटात
एकअसा पट्ट्या आहे ज्याची निवडून येण्याची पात्रता नाही, पण बिनविरोध
म्हणले की सर्वात लाईनीच्या पुढे, निवडणूक लढवायचे म्हणले की सगळ्यात मागे,
जो उचलाव आहे तालुक्याचा ज्याच्याशी काही संबंध नाही असल्या माणसांमुळे
संपूर्ण खासदार गट संपणार असल्याचा घनाघात महादेव पोकळे यांनी केला. पण तो
खासदार गटातील पट्ठ्या कोण अशी चर्चा सुरु होती
No comments:
Post a Comment