सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पुसेसावळी: विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करताना आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या ‘सूर्याजी पिसाळ’ यांच्या उल्लेखाचा अखिल भारतीय युवक मराठा महासंघाने पत्रक काढून निषेध केला असून पिसाळ फितूर नव्हते याचा दाखल देत आमदार गोरेंना इतिहासाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.
याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे केंद्रीय युवक प्रतिनिधी दशरथ पिसाळ यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सूर्याजी पिसाळ यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. मात्र काही असंतुष्ट, अभ्यास नसलेले व समाजविघातक प्रवृत्ती त्यांच्यावर फितुरीचा कलंक लावत आहे. त्याला जयकुमार गोरेही अपवाद नाहीत. त्यामुळे आमदार गोरे यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार गोरेंना समज द्यावी अन्यथा पिसाळ परिवार व त्यांच्याशी जोडलेले नातेवाईक भाजपबद्दल योग्य तो विचार करतील, असे पिसाळ यांनी पत्रकात म्हटले आहे.
Saturday, September 10, 2022
‘सूर्याजी’ उल्लेखामुळे आमदार जयकुमार गोरेंचा निषेध
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment