सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
रहिमतपूर:
सभेत टीका केल्याच्या कारणावरुन सरपंच परिषदचे नागझरी गा वचे राष्ट्रवादी चे सरपंच जितेंद्र भोसले यांना शिवीगाळ दमदाटी , मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची रहिमतपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
पोलिसांकडुन मिळाललेल्या माहितीनुसार शनिवार १० रोजी साडेबाराच्या सुमारास जितेंद्र भोसले हे वाठार किरोली येथे पाळीव कुत्र्याला जनावरांच्या दवाखान्यात अौषध देणेसाठी गेले होते. वाठार गावातील दवाखाना नव्याने दुसरीकडे सुरु असल्याने तिकडे जाण्यासाठी निघाले असता किरण भिमराव पाटील, याने जितेंद्र भोसले यांची गाडी अडवुन खाली उतरायला सांगितले परंतु भोसले यांनी उतरण्यास नकार दिला. माझे वडीलांनी तुला पंचायत समितीत समज दिली होती ना की आमच्यावर टिका करु नकोस कालच्या आमदारांच्या सभेत आमच्यावर टिका का केली? असे म्हणत किरण गायकवाड आणि नारायण शंकर गायकवाड यांनी जितेंद्र भोसले तोंडावर हाताने मारहाण केली सदरची भांडणे धनाजी गायकवाड पाटील, काकासो गायकवाड यांनी सोडवली यावेळी शिवीगाळ,जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे
तक्रारीत नोंद आहे.
No comments:
Post a Comment