सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कलेढोण:- खटाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हणमंतराव साळुंखे वि.का.स.सेवा.सोसायटीच्या २०२३ या पंचवार्षिक निवडणुकीत संजीव साळुंखे व सोमनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली हनुमान पँनलने निर्विवाद वर्चस्व मिळवत १३ जागांवर विजय संपादन केला. या निवडणुकीत शरदचंद्र भोसले व सुरेशशेठ शिंदे यांच्या ग्रामविकास आघाडी या पँनेलला एक ही खाते उघडता न आल्याने पराभव स्वीकारावा लागला.
कलेढोण येथील जि.प शाळे मध्ये सोसायटीच्या १३ संचालक पदासाठी काल शनिवारी स.८ ते सायं.४ या वेळेत मतदान पार पडले.९१६ सभासदा पैकी ६५५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील माळी व सहाय्यक निबंधक बाळासाहेब भोसले यांच्या उपस्थित मतमोजणी करण्यात आली.सायं सात वाजता निकाल घोषित होताच हनुमान पँनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोस्तव साजरा केल्यानंतर विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गटा-तटाचे राजकारण न करता सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय सोसायटीत घेतले जातील असे आश्वासन संजीव साळुंखे यांनी दिले.यावेळी संजय टकले, मजनू मुलाणी,राजेंद्र कणसे,रमेश पाटील,राजू नायकुडे,मारुती गारळे,विजय ढोकळे,प्रविण कदम,जालिंदर बुधावले, गारुडी गावचे सरपंच नागेश सरगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हनुमान पँनलचे विजयी उमेदवार सर्वसाधारण गट- इंगवले शिवाजी पांडुरंग (३५५),कुमठेकर अमजतखान (३५१),गारळे पोपट शंकर (३४८),सचिन ईश्वरा चव्हाण (३४९),दबडे महेश शिवाजी (३४४),माळी धनाजी किसन (३४९),लोखंडे सुनील चंद्रकांत (३४९),शेटे प्रकाश कल्लापा (३४३) महिला राखीव गट- कुंभार मंगल मालोजी (३४९),ढोकळे सुनिता बाळू (३४८) अनु.जाती. जमाती गट- खरात विलास भागवत (३५४) वि.जा.भ.ज/वि.मा.प्रवर्ग गट- बुधावले राजेंद्र रघुनाथ (३६५) इतर मागास प्रवर्ग गट-सुतार महादेव लक्ष्मण (३६४)

0 Comments