Hot Posts

6/recent/ticker-posts

दहीवडीत ठेकेदाराला जिवे मारण्याची धमकी

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले 
दमदाटी व शिवीगाळ तसेच जीवे मारल्याची धमकी व मारहाणप्रकरणी एकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
       किसन सस्ते(रा.कासारवाडी, ता.माण) यांच्या विरोधात विजय कुदळे (वावरहिरे,ता.माण)यांनी याप्रकरणी किसन सस्ते याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
       पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामाचे टेंडर ऑनलाइन का भरलेस? असे म्हणत ऑनलाइन टेंडर भरल्याचा राग मनात धरून टेंडर मागे घे, नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही,असे म्हणत ठेकेदार विजय कुदळे यांना फलटण चौकात दमदाटी व शिवीगाळ व जीवे मारल्याची धमकी दिली. 
         टेंडर मागे घेण्याबाबत तक्रारदार यांना एक महिन्यापासून दमदाटी केली जात असून किसन सस्ते फलटण चौकात काहीही विचारपूस न करता मारहाण केली असल्याचे समजते. 
          यामुळे दमदाटी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी किसन सस्ते यांच्याविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments