सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वडूज
येथील जवान मयुर जयंत यादव
( वय २९ ) यांचे अंबाला ( पंजाब) कॅम्प येथे देशसेवा बजावताना अपघाती निधन झाले. या घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे. मृत मयुर यांचे
पार्थिव उद्या ( मंगळवारी ता.१८) दुपारी बारा
वाजेपर्यंत येथे येणार असल्याची माहिती सूत्रांनी
दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयुर हे
२०१५ साली लष्करात भरती झाले होते. ते सद्या १४५ बटालियन मध्ये लान्स नायक या पदावर कार्यरत
होते. अंबाला येथील कॅम्प येथे शनिवारी (ता.१५)
दुचाकी वरून ते त्यांच्या अन्य एका सहकाऱ्यासोबत
जात होते. त्यावेळी गतीरोधकावरून दुचाकी जात
असताना जवान मयुर खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या
डोक्याला गंभीर इजा पोहोचल्याने उपचारासाठी
त्यांना तेथील लष्कराच्या दवाखान्यात दाखल
करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज (
सोमवारी ता. १७ ) सकाळी त्यांची प्राणज्योत
मालवली. मृत जवान मयुर यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले होते.
मयूर यांचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई,वडील, बंधू, पत्नी, तीन वर्षांची लहान मुलगी
असा परिवार आहे. जवान मयूर यांचा येथे मोठा मित्र
परिवार होता. तसेच त्यांचा सामाजिक कार्यातही
सहभाग होता. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी
समजताच शहरावर शोककळा पसरली.
0 Comments