गुरुवारी-शुक्रवारी विविध कार्यक्रम, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने होणार सन्मान
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रुक: महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणार्या तीर्थक्षेत्र सोळशी येथे शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यावतीने भव्य दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना या कार्यक्रमादरम्यान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे
गुरुवारी 18 रोजी दुपारी 1 वाजून 35 मिनिटे या वेळी गोपूजन, धर्मध्वजारोहण आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी 19 रोजी रोजी शनैश्वर जन्मोत्सव सोहळा पार पडणार असून सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळाचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचे युवा म्हणून जगताना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
तसेच हरिभक्त परायण समन्वयमहर्षी शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर महाराज आळंदी यांच्याहस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते अंतर्मनाची मशागत व कर्मातून धर्माकडे या प्रवचन मालिकेचे प्रकाशन होणार आहे.
दुपारी अडीच वाजता प.पू शिवयोगी त्यागेश्वर महाराज यांची सवाद्य भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक व 5:30 वाजता शनैश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार व इतर विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यामध्ये शनैश्वर कृतज्ञता युवा धर्मरक्षा पुरस्कार विक्रम विनायक पावस्कर, हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष, यांना देण्यात येणार आहे तर शनैश्वर कृतज्ञता उद्योगरत्न धर्मरक्षा पुरस्कार मनोजशेठ नथमलशेठ जैन सातारा यांना देण्यात येणार आहे तर शनैश्वर कृतज्ञता भूमिपुत्र धर्मरक्षा पुरस्कार माधवराव दत्तात्रयराव सोळस्कर, ज्येष्ठ सिनेअभिनेते, नायगाव यांना देण्यात येणार आहे. शनैश्वर कृतज्ञता नाट्यभूषण धर्मरक्षा पुरस्कार धनराज मारुतीराव जगताप, भणंग यांना देण्यात येणार आहे. शनैश्वर कृतज्ञता सहकार धर्मरक्षा पुरस्कार पुष्पक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला देण्यात येणार आहे.
या कार्यक्रम सोहळ्याला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदार संघ, सुधीरकुमार बुक्के धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार मदन भोसले, सातार्याच्या सहायक धर्मादाय आयुक्त चंदा ढबाले या मान्यवरांची कार्यक्रम सोहळ्याला प्रमुख उपस्थिती आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी केले आहे.

0 Comments