सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
वडूज: येरळवाडी, ता. खटाव येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत ४ घरांना लक्ष्य केले. चारच दिवसांपूर्वी याच परिसरातील सूर्याचीवाडी येथे भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून साडेसहा लाखांवर डल्ला मारला होता.
येरळवाडी येथे चोरट्यांनी सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज लंपास केला. रात्री उशिरापर्यंत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते. ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली व तपासाच्या सुचना
केल्या. चारच दिवसांत चोरट्यांनी दुसऱ्या गावाकडे मोर्चा वळविल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
0 Comments