सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रुक
40 हजार रुपयांची लाच घेताना
आरोपी लोकसेवक संजय रावसाहेब बोबडे, वय ५८ वर्षे, पद- मंडलअधिकारी पिंपोडे बु// ता. कोरेगाव याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी. यातील तक्रारदार यांचे मौजे मोरबंदवाडी गावचे गट नंबर 28 मधील जमिनीतून स्वखर्चाने गाळ ,मुरूम, माती, काढून वाहतूक करण्याकरता भाड्याने वापरलेला जेसीबी व ट्रॅक्टर जप्त न करणे साठी व गौण खनिज कायद्याअंतर्गत कारवाई न करणे करिता लोकसेवक बोबडे मंडलाधिकारी , पिंपोडो बु// ता . कोरेगाव यांनी तडजोडीअंती ४००००/- रुपये लाचेची मागणी केली.
याप्रकरणी वाठार पोलीस ठाणे येथे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments