Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरेगावच्या 2 टोळ्यातील 5 जण तडीपार



 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा जिल्हयामध्ये कोरेगाव तालुक्यातील शरिराविरुध्दचे सात्यताने गुन्हे कारणारे टोळी प्रमुख १) अथर्व अजय पवार वय १९ वर्षे, रा वसुधा पेट्रोलपंपाचे जवळ, कोरेगाव ता कोरेगाव जि सातारा (टोळी सदस्य) २) तौफिक शब्बीर शेख वय २० वर्षे, रा. केदारेश्वर रोड, कोरेगाव ता. कोरेगाव जि सातारा. ३) निरज तानाजी बोडरे उर्फ फक्की वय १९ वर्षे, रा. केदारेश्वर रोड, कोरेगाव ता कोरेगाव जि सातारा (टोळी सदस्य) यांचेवर सातारा जिल्हयामध्ये गर्दी मारामारी करून दुखापत करणे, कोयत्या सारखे घातक शस्त्रे बाळगुन दुखापत करणे, अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हे दाखल असल्याने कोरेगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक एस. आर. बिराजदार यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता..

तसेच कोरेगाव तालुका परिसरात शरिराविरुध्दचे सात्यताने गुन्हे कारणारे १. युवराज भरत जगदाळे वय २२ वर्षे रा कुमठे ता कोरेगाव जि सातारा (टोळी प्रमुख) २. अथर्व सुशांत जगदाळे वय २१ वर्षे रा कुमठे ता कोरेगाव जि. सातारा ( टोळी सदस्य) यांचेवर सातारा जिल्हयामध्ये रस्ता आडवून दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, गर्दी मारामारी करुन अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत येणारे जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हे दाखल असल्याने कोरेगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक एस. आर. बिराजदार यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगाव यांनी चौकशी केली होती.
यातील टोळी मधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांना अटक व कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन त्यांनी सातारा जिल्हयातील सर्वसामन्य लोकांना मारहाण करुन गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील दोन्ही टोळ्यांना मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून ९ उपद्रवी टोळ्यांमधील २४ इसमांना तडीपार करण्यात आले सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
 सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्री बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोना प्रमोद सावंत, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो. कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments