
देवापूर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राज्यभर विविध दौरे करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे काम केले आहे. माण तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून राज्यभर माण तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार दहिवडी येथे शुक्रवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी दहिवडी या ठिकाणी येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी कुकुडवाड गटात गाव भेट दौरे सुरू केलेले आहेत .मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दहिवडी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केलेआहे .ते पळसावडे व देवापुर या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
उपस्थितांशी बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की साहेबांच्या लौकिकाला साजेसा असा कार्यक्रम होत असून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय होणार असून गावच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे .
यावेळी उपस्थित महाबळेश्वर वाडी चे माजी सरपंच विजय जगताप, संजय जगताप, जालिंदर खरात ,दिलीप खरात, किरण खळवे ,युवा नेते ऋषिकेश जगताप, भागवत पिसे यासह देवा पूर चे सरपंच शहाजी बाबर, रावसाहेब बाबर, ज्ञानदेव बाबर , कैलास कांबळे, काकासो बाबर, तानाजी औताडे, आनंदराव बाबर, संतोष बाबर, कृष्णराव बाबर, सागर बाबर, तुकाराम बाबर, अरुण सावंत, शिवराम बनसोडे, दिलिप जाधव, प्रवीण बाबर यांच्यासह
ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments