Hot Posts

6/recent/ticker-posts

36 लाखांच्या अपहार प्रकरणी भाडळी बुद्रुकच्या माय लेकासह चौघांना 5 वर्ष सक्त मजुरी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण १. रंजना रामचंद्र निकम रा. भाडळी बु ता. फलटण जि.सातारा २. विक्रम - रामचंद्र निकम रा. भाडळी बु// ता. फलटण जि.सातारा ३. सौ.मंदाराणी शिवाजी ढमढेरे रा. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे ४. शिवाजी तुकाराम ढमढेरे रा. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे ५. किशोर देवीदास भोसले रा. टेनीलाईटस सोसा. पिंगळेगुरव, सांगवी, पुणे यांनी आपआपसात संगणमत करुन शिवजीत मुद्रा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचा शाखा फलटण येथे स्थापन करुन विविध योजनेत फिर्यादीस रुपये १,२७,५००/- रु. चा भरणा करुन घेवुन मुदत पूर्ण झालेनंतर यातील फिर्यादीने वेळोवेळी मुदत पूर्ण झालेल्या रकमेची मागणी करुन देखील पैसे परत न देता यातील आरोपींनी फिर्यादीची व इतर महिलांची फसवणुक केली आहे.

शिवजीत मुद्रा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचा शाखा फलटण चे अध्यक्ष १) सौ.मंदाराणी शिवाजी ढमढेरे रा. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे, चेअरमन २) शिवाजी तुकाराम ढमढेरे रा. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे, मॅनेजर ३) रंजना रामचंद्र निकम रा. भाडळी बु// ता. फलटण जि.सातारा, ४) विक्रम रामचंद्र निकम रा. भाडळी बु// ता. फलटण जि. सातारा, ५) किशोर देवीदास भोसले रा. टेनीलाईटस सोसा. पिंगळेगुरव, सांगवी, पुणे. यांनी सदर सोसायटी मधील बचत ठेव, शेअर्स, पिग्मी, बचत गट, धनवर्षा, लकी ड्रॉ कुपन, एटीएम कार्ड अशा प्रकारच्या सुविधा देवुन ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून एकुण रक्कम रुपये ३६,२८,७८७/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली असल्याने दिले खबरी वरून फलटण शहर येथे गुन्हा रजि दाखल झालेला होता.

सदर गुन्हयाचा तपास श्री. ए. एस. गायकवाड तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सातारा
यांनी करून आरोपी तात्काळ अटक केले. आरोपीविरूध्द भक्कम पुरावा गोळा करून मा. न्यायालयांत दोषारोप पत्र सादर केले.
सदरचा खटला मा. न्यायाधीश श्री. ए. एस. जाधव सो, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश १ ले, सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फ अँड. श्री. लक्ष्मणराव खाडे अति. जिल्हा सरकारी वकील, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद केसमध्ये एकुण १८ साक्षीदार तपासणेत आले. साक्षीदारांचे साक्षीवरून मा.न्यायाधीश श्री. ए.एस. जाधव सो, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश १ ले, सातारा यांनी उक्त आरोपी क्र.१,२,३,४ यांना महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंधाचे संरक्षण अधि. कलम ३ अन्वये ०५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी रु.५०,०००/- दंड, दंड न भरलेस ०६ महिने सक्तमजुरी, व भा.द.वि.स.कलम ४२०, ३४ अन्वये ०५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी रु.५०,०००/- दंड, दंड

न भरलेस ०६ महिने सक्तमजुरी शिक्षा दिली आहे. (आरोपी क्र.५ यास निर्दोष मुक्त केले आहे.) सदर केसकामी राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण, सुनिल शेळके पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे व पैरवी अधिकारी स.पो.फौ. संजय पाटील, व पो. कॉ.ब.नं. २१०२ अमोल घोरपडे फलटण शहर पोलीस ठाणे यांनी परिश्रम घेतले. या कामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, पोलीस उप-निरीक्षक सुनिल सावंत, स.पो.फौ. शशीकांत गोळे, पो. हवा. गजानन फरांदे, पो. कॉ. अमित भरते यांनी योग्य ती मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments