सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध: वडूज - पुसेगाव रस्त्यावर खटाव गावच्या हद्दीत जाधवाचे लवण (कॅनॉल जवळ) पुणे-वडूज एस.टी. बसने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एसटी मधून प्रवास करणाऱ्या 17 प्रवाशांसह एसटीचे चालक आणि वाहक देखील गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खटावच्या जवळ असणाऱ्या जाधवांचे लवण या परिसरामध्ये हि दुर्दैवी घटना घडली. अपघात अतिशय भीषण असल्याने दुचाकीस्वार गणेश शिवाजी काटकर, रा. कुकुडवाड, ता. माण हे गंभीररीत्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना वडूज ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. जखमींपैकी काहींना वडूज ग्रामीण रुग्णालय, तर काहींना सातारा येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
0 Comments