Hot Posts

6/recent/ticker-posts

क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीची वसुलीत उदासीनता


क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीचे गाळे व हद्दीतील इतर दुकानांची ४,६१,४०० कर येणे बाकी : माहिती अधिकार माहिती उघड*
*वार्ताहर: शेखर कदम, क्षेत्र महाबळेश्वर*
---------------------
 ब वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत पंचायत गाळे व हद्दीतील इतर दुकानांच्या कर वसुलीबाबतची उदासिनता माहिती अधिकार उघड झाली आहे.तब्बल ४,६१,४०० रूपयांचा कर हा येणे बाकी असून याबाबत ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवरची उदासीनता यावरून दिसून येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की माहिती अधिकारात या कराबाबतची माहिती मागीवली असता श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने २८ ऑगस्टला हि माहिती दिली यामध्ये ग्रामपंचायतीचे गाळे व हद्दीतील इतर दुकानांचा एकूण ४,६१,४०० रूपयांचा कर ग्रामपंचायतीला येणे बाकी आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीला ब वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त आहे आणि याच ग्रामपंचायतीमध्ये अशाप्रकारची कर वसुलीबाबतची माहिती माहिती अधिकारात उघड झाल्याने ग्रामपंचायतीची कर वसुलीबाबतची उदासीनता दिसून येत असल्याची मते व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments