Hot Posts

6/recent/ticker-posts

‘चैतन्य’ पतसंस्थेचे पाच घोटाळेबाज जेरबंद, चार वर्षांपासून होते फरारी, 13 लाखांचे सोने हस्तगत


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा  : खटाव तालुक्यात गाजलेल्या चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत घोटाळा करून फरारी झालेल्या पाच घोटाळेबाजांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 12 लाख 93 हजार रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. नीलेश गजानन येळगावकर (शाखाप्रमुख) रा. पंतनगर वडुज ता. खटाव, रवींद्र आनंदराव गोडसे (वसुली अधिकारी, रा. शिवाजीनगर वडूज, अमित विलास काळे (शाखाप्रमुख,  रा. हिंगणे ता. खटाव), भानुदास वसंत काळुखे (शाखाप्रमुख, रा. काळुखे वस्ती खातगुण ता.खटाव, संतोष मधुकर काळे (कॅशिअर, रा. हिंगणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

चैतन्य पतसंस्थेचे चे तत्कालीन संचालक, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक, शाखाप्रमुख, कॅशिअर यांनी संगनमताने अपुरे कागदपत्रे असताना गृहतारण कर्ज वाटप, बोगस ठेवतारण कर्ज वाटप, संस्थेच्या नावावर अनावश्यक बँक खाती निबंधकाचे परवानगी शिवाय उघडून त्यावर मोठे व्यवहार करण्यात आले आहे याबाबत लेखापरिक्षण करून 18 कोटी 28 लाख 92 हजार 334 रूपयांचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चाचणी लेखापरीक्षण दरम्यान आणखी 3 कोटी 09 लाख 83 हजार 328 रूपयांचा अपहार उघडकीस आला व अंतीम वैधानिक लेखापरिक्षणामध्ये 6 कोटी 07 लाख 24 हजार 134 रुपये 74 पैसे एवढ्या रक्कमेचा अपहार उघडकीस आला  एकुण 27 कोटी 46 लाख 02 हजार 797 रुपये  रक्कमेचा अपहार करण्यात आलेला आहे. 

सदर गुन्हयांच्या तपासामध्ये 24 आरोपींपैकी 10 आरोपीविरूध्द 13 एप्रिल 2022 रोजी दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते उर्वरित आरोपी पाहिजे असलेने त्यांच्याविरूध्द  विशेष जिल्हा सत्र न्यायालय वडूज यांच्याकडे  पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार मा. कोर्टाने दि. 07/09/2022 रोजी नॉनबेलेबल वॉरट जारी केले होते.  त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली होती. 

त्यादरम्यान वरील सर्व आरोपींची गुन्हयांच्या तपासाच्या अनुशंगाने घरझडती घेतली असता नामे भानुदास वसंत काळुखे यांच्या घरझडती दरम्यान चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वडूज पतसंस्थेच्या लॉकरसच्या चाव्या मिळून आल्या. 

त्याबाबत आरोपीस विचारणा केली असता त्यांने संबधित लॉकर मध्ये सोने तारण कर्जातील काही कर्जाचे सोने ठेवले असलेबाबत सांगितले त्याबाबत निवेदन पंचनामा करून 287.220 ग्रॅम मिली सोने अंदाजे 12 लाख 93 हजार रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments