Hot Posts

6/recent/ticker-posts

दहिवडी मलवडी रस्त्यावर अपघात ; स्विफ्ट कार दुचाकींची समोरासमोर धडक, तीन जण जखमी

दै. सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले : दहिवडी मलवडी रस्त्यावर असणाऱ्या सम्राट हॉटेलजवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिहेरी अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले असून कार चालकाला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सेवानिवृत्त सैनिक भीमराव शिवाजी शेंडे (रा.आंधळी,ता.माण) हा दारू पिऊन आपली स्विफ्ट कार चालवत होता. त्याचवेळी सम्राट हॉटेलजवळ मलवडी हून येणाऱ्या दोन्ही दुचाकींना कारने जोरदार धडक दिली. यामध्ये पांडुरंग तुकाराम मगर(वय-५०), वैशाली पांडुरंग मगर (वय-४५) रवींद्र रत्नाकर देवकर (वय-५०, सर्व रा.मलवडी) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ वडूज या ठिकाणी हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत भीमराव शिवाजी शेंडे , रा.आंधळी यास ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments