औंध
राजाचे कुर्ले, ता. खटाव येथील सज्जनराव वामनराव माने, वय 74 यांचा मुलगा विशाल सज्जनराव माने याने घर व जमीन नावावर करून देत नसलेच्या कारणावरून मारहाण करून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला असलेची तक्रार औंध पोलीस ठाणे अंकित पुसेसावळी दुरक्षेत्र येथे दिली आहे.
रविवार दि. 08/10/2023 रोजी रात्रौ 9.00 वाजण्याचे सुमारास राजाचे कुर्ले, ता. खटाव गावचे हद्दीत सज्जनराव माने यांचे घरात त्यांचा मुलगा विशाल सज्जनराव माने, रा. राजाचे कुर्ले, ता. खटाव याने जमीन व घर त्याचे नावावर करून देत नसल्याचे कारणावरून खोऱ्याने घराच्या खिडकीच्या काचा फोडून व घरासमोरील दरवाजा तोडून घराला आग लावण्याच्या उद्देशाने घराच्या समोर तळवटात झाकून ठेवलेले वाळलेले उडीद घरात ओढत आणले आणि ते पेटवून देऊन घरात आग लावली. सज्जनराव माने, त्यांची पत्नी व मुलगी असे सर्वजण आग विझवण्याचा प्रयत्न करीत असताना मुलगा विशाल याने सज्जराव माने यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी केली.
सदर घटनेची तक्रार पुसेसावळी दुरक्षेत्र येथे दि. 9/10/2023 रोजी दुपारी 4 वाजता रजिस्टर झाली असून औंध पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. ए. ठिकाणे अधिकचा तपास करत आहेत.
0 Comments