सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले : माण तालुक्यातील सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी ता माण जिल्हा सातारा या पतसंस्थेत संचालक मंडळाने संस्थेच्या निवडणूकीसाठी बनावट कर्ज प्रकरणे करून 72 लाख 86 हजार 533 रुपयांचा अपहार केला असल्याची तक्रार शासकीय लेखापरीक्षक अनिल सचितानंद पैलवान रा सांगली यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याची माहिती सपोनि अक्षय सोनवणे यांनी दिली.
सविस्तर माहिती अशी असून तालुक्यासह जिल्हयात व मुंबई पर्यत शाखा असणाऱ्या सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी या संस्थेत
4/2/2012 ते दिनांक 15/ 11 /2017 या कालावधीत या पतसंस्थेच्या शाखा क्रमांक 1 मध्ये आपसात संगणमत करून त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत संस्थेच्या 2015 -16 ते 2020- 21 या कालावधीमधील संचालक मंडळाच्या निवडणूक खर्चासाठी बनावट कर्ज प्रकरण तयार करून त्या रकमेचे वाटप दर्शवत त्या रकमेचा वापर केला आहे तसेच हा अपहार निदर्शनास येऊ नये म्हणून संस्थेतील 1. कै. वाघोजीराव पिलाजीराव पोळ (संस्थापक )
2.सुनील वाघोजीराव पोळ (चेअरमन )
3.रणजीत साहेबराव पोळ (तात्कालीन सर व्यवस्थाप)
4.महादेव रामचंद्र गोंजारी (तात्कालीन उप व्यवस्थापक व कर्जदार )
5.संदीप सर्जेराव चव्हाण (कर्मचारी )
6.दीपक किसनराव खुळे (कर्मचारी )
7.राहुल शिवाजीराव कट्टे (कर्मचारी )
8.वसंत रघुनाथ गायकवाड (कर्मचारी )
9.दिलीप शिवाजी कदम (तात्कालीन शाखाव्यवस्थापक )
10.सुशांत बबन जाधव (तात्कालीन रोखापाल )
11.अमित आप्पासो गोंजारी (तात्कालीन रोखापाल )
सर्व राहणार दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा सर्व कर्मचारी यांना ज्यादा पगार दिल्याचे दर्शवून सदर जादा पगारातून सदरचे कर्ज रक्कम रुपये 31लाख ,56 हजार ,950 रुपये -भरणा करून संस्थेची व ठेवीधाराची फसवणूक केली आहे यांनी कर्जदार गणपत आनंदराव मोरे यांना दिलेले कर्ज सुशीला वाघोजीराव पोळ यांच्या खात्यात ट्रान्सफर करून त्यामधून वेळोवेळी रकमा काढून अपहार करून सदरचा अपहार निदर्शनास येऊ नये म्हणून संस्थेचे सर्व कर्मचारी यांना जादा पगार दिला असल्याचे निदर्शनास आले आहे ठेवीदार सभासद व संस्थेचा विश्वासघात करून करून एकूण रक्कम रुपये 72लाख ,86 हजार ,533/-एवढ्या रकमेचा अपहार केलेला आहे या बाबत सरकारतर्फे फिर्यादी हे शासकीय लेखापरीक्षक असून त्यांनी सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था दहिवडी या पतसंस्थेचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण करून सहकार कायद्यातील तरतुदीनुसार मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे अहवाल सादर केला होता त्यास अनुसरून . अपर निबंध लेखापरीक्षण सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे ने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (5) ब ने गुन्हा नोंदी बाबत प्राधिकृत केले ने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती दहिवडी पोलिसांनी दिली
0 Comments