विद्युत पंप धारक शेतकरी संघटना जावळी यांची मागणी
मेढा प्रतिनिधी :- जावळी तालुक्यातील कण्हेर जलाशयातील सर्व विद्युत पंप धारक शेतकरी संघटना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री शंभूराजे देसाई , खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले,जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी सातारा , पाठबंधारे साताऱ्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले
जावळी तालुक्यातील कण्हेर जलाशयातील विद्युत पंप धारक शेतकरी संघटना यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही विद्युत पंप धारक शेतकरी आम्हा शेतकऱ्यांस पाटबंधारे विभागा कडून जी पाणीपट्टी आकारली जाते ती सर्व शेतकऱ्यांची पाणी पट्टी कायम स्वरूपी माफ करण्यात यावी. पाणी पट्टी कायम स्वरूपी माफ करण्याचे कारण की आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी धरणासाठी संपादित झाल्या असून आम्ही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने एरिकेशन स्किमा केलेल्या आहेत या स्किमांचा मेंटेनन्स आम्हास जास्त येत असतो आणि विजबिले सुध्दा जास्त येतात ती आम्हाला भरावी लागतात.
चालू वर्षी राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने पुर्ण क्षमतेने धरणे भरलेली नाहीत हे आपणांस ज्ञात आहे. परंतु कॅनॉलद्वारे धरणाखालील गावांना पाण्याचा विसर्ग करित आहात धरणाच्या खालील खालील गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे परंतु जावलीतील पंप धारक शेतकऱ्यांचे जे हक्काचे पाणी आहे ते आम्हा जावळीकरांना सुध्दा कायम स्वरूपी मिळावे धरणामध्ये गाळाचे प्रमाण जास्त असल्याने धरणातील पाणी मार्च, एप्रिल, मे महिन्या मध्ये आम्हा शेतकऱ्यांना मिळत नाही तरी धरणातील पाणी साठा मे अखेर पर्यंत कायम राखला जावा.
आम्ही शेतकऱ्यांनी २० लाखांपर्यंत स्वखर्चाने एरिकेशन स्किमा केलेल्या आहेत. आमच्या बागायती पिकास मे महिन्या अखेर पर्यंत पुरेसे पाणी मिळत नसल्याने आम्हा शेतकऱ्यांच्या बागायत पिकाचे नुकसान होत असून आम्हास आर्थिक स्थितीस सामोरे जावे लागत आहे तरी आम्हा शेतकऱ्यांच्या या निवेदनाचा शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करावा व जावळी तालुक्यातील कण्हेर जलाशयातील सर्व विद्युत पंप धारक शेतकर्यांना न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments