फलटण :
फलटणला एक आगळी वेगळी अशी सामाजिक सलोख्याची परंपरा आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यातील ओबीसी समाजातील
कार्यकर्त्यांना तसेच ओबीसी आंदोलनात भाग घेणाऱ्या सामान्य नागरिकांना फोन
द्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून धमकवण्याचे काम सुरू आहे. तरी आता ह्यापुढे
अशा घटना झाल्या तर आम्हाला सुद्धा वेगळा पर्याय निवडावा लागेल; आम्ही
कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही या पुढे अशा घटना घडल्यास कायदेशीर
मार्गाने उत्तर देऊ असे मत समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे
व्यक्त केले.
फलटण येथील श्री संत सावता
मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापूराव शिंदे बोलत होते. यावेळी भाजपा
तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव, बाळासाहेब
कुंभार ,गोविंद भुजबळ ,रणजित भुजबळ ,अमिरभाई शेख विकास शिंदे अमोल रासकर
शरद कोल्हे, अंबादास दळवी , दत्ता नाळे वैभव नाळे बापूराव बनकर यांच्यासह
विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी
बोलताना शिंदे म्हणाले की; मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या सभांमधून
ओबीसींना ना. छगन भुजबळ यांच्यावर टीका केली जात आहे; ही टीका अतिशय
खालच्या पातळीची असून यामुळे ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यावर
आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. आगामी काळामध्ये जर ना. भुजबळ यांच्यावर
टीका केली तर ती सहन केली जाणार नाही.
दि. ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे जो ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
त्याला जाण्यासाठी गावोगावी बैठका घेऊन जाण्याची तयारी करन्यात आली आहे .
सर्व घटकांना एकत्र येऊन आम्ही लढा लढत आहोत; असे मत भारतीय जनता पार्टीचे
तालुका अध्यक्ष बजरंग गावडे यांनी केले.
आता ओबीसीमध्ये अनेक जाती व धर्म आहेत. यामध्ये आताच्या घडीला अनेक समस्या
आहेत; त्याला सर्व जण एकत्रित सामोरे जावे लागत आहे. ओबीसी मधून आरक्षण न
देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. आता महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली
पाहिजे; अशी मागणी जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव व राष्ट्रीय
काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांनी केली.
विकास शिंदे यांनी फलटण तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने स्वागत केले तर विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment