Ticker

6/recent/ticker-posts

वाईत पालिकेकडून स्टेट बँकेची इमारत सील


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
वाई पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा घरपट्टी वसुलीचा धडाका ,स्टेट बँकची इमारत केली सील.इमारतीच्या करारनाम्याची मुदत दिनांक ३१/०३/२०२० रोजी संपलेली असून सदर इमारतीचे सन २०२३-२४ अखेर नगरपरिषदेस येणे असलेली इमारत भाडे रक्कम रुपये २१लाख ६३हजार ९५४ बाकी आहे.वारंवार मागणी करूनही ,पर्यायी जागा देऊनही जागा खाली करण्यास नकार दिल्याने आज सकाळी पालिकेने बँकेची इमारत पोलिस बंदोबस्तात सील केली. त्यामुळे एकच खळबळ ग्राहकांची व्यवहारा अभावी कुचंबणा झाली.
दरम्यान, मंडईतील आणखी जागा व गाळे सील करणार असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी व कर निरीक्षक कांबळे व बारटक्के यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments