नवनाथ भिसे
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
गोंदवले : म्हसवड बस स्थानका अंतर्गतच्या बंद करण्यात आलेल्या एस.टी. बसच्या स्थानिक सर्व फेऱ्या दहिवडी आगाराने तातडीने चालू कराव्यात या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने दहिवडी आगार प्रमुखांना देण्यात आले.
सध्या एसटी फेऱ्या बंद केल्या असल्याने म्हसवड बस स्थानक अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रवाशांचे व शालेय विद्यार्थ्यांचे येण्या-जाण्यासाठी प्रचंड हाल होत असून म्हसवड पंचक्रोशीतील नागरिकांना कोण वाली आहे का? असा सवाल ग्रामीण भागातील सर्वसामान्यातून विचारला जात आहे.
म्हसवड बस स्थानकावरील प्रवाशांचे आणि शालेय विद्यार्थ्यांचे क्लासला ये-जा करण्यासाठी भयानक हाल होत असल्याने याबाबत जिल्हा एस.टी. प्रशासनाने म्हसवड पंचक्रोषीत अंदाजे ५० लहान मोठी गावे आहेत. या ५० गावात साधारणतः आठ प्रमुख रस्ते आहेत. एका रस्त्याच्या माध्यमातू साधारणतः सहा ते सात गावे कव्हर होतात. म्हसवड बस स्थानकातून या प्रमुख रस्त्यावर असणाऱ्या एस.टी. च्या बहुतेक सर्व फेऱ्या दहिवडी आगाराने बंद केलेल्या असल्याने प्रवाशांची गैरसोय व शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हसवड-विरळी, म्हसवड-खरसुंड म्हसवड-इंजबाब, म्हसवड-संभुखेड, म्हसवड-माळशिरस व्हाय भाटकी, म्हसवड-शिंगणापूर, म्हसवड-हिंगणी, तसेच म्हसवड-देवापूर, वरकुटे-मलवडी इत्यादी ठिकाणी स्थानिक एस.टी फेरी माध्यमातून दररोज हजारो प्रवाशांना एस.टी.च्या सेवेचा लाभ होत होता.
गेल्या आठ ते दहा दिवसापासून म्हसवड बस स्थानक अंतर्गतच्या बहुतेक सर्व फेऱ्या, व मुक्कामी एस.टी. सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.बरेच कॉलेजला जाणार विद्यार्थी दोन चाकी वरुन येजा करतात मात्र गरिबांच्या प्रवासाचे काय ?
चौकट....
म्हसवड परिसरातील ५० गावातील प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दहिवडी आगाराने आठ दिवसापुर्वी बंद केलेल्या एस.टी.च्या सर्व फेऱ्या व मुक्कामी सुविधा तातडीने दोन दिवसाचे आत सुरु कराव्यात अन्यथा एस.टी. प्रशासनाविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल. यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी एस.टी. प्रशासनाची राहिल. असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.
0 Comments