Ticker

6/recent/ticker-posts

सातार्‍यातील व्यापार्‍यावर वीजचोरीचे तीन गुन्हे

सत्य सह्याद्री/सातारा
सातार्‍यातील मोती चौकातील व्यापारी मोहित कटारिया याच्याविरोधात वीजचोरी केल्याप्रकरणी तीन गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. वीज कंपनीच्या भरारी पथकाच्या वर्षा संतोष गायकवाड (रा.वनवासवाडी, ता. जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. मोहित शांतीलाल कटारिया (रा. 194, सदाशिव पेठ मोती चौक, सातारा) यांनी लबाडीने व वीजचोरी करून वीज कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ग्राहक क्र. 190560366179 , 19056027471, 190560110387 या तीन क्रमांकाच्या मीटरमधून वीजचोरी केल्याचे म्हटले आहे.
  दि. 20 मे रोजी  छापा मारल्यानंतर ही  बाब उघड झाली होती. सदरचा गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होता. तेथून 5 जून रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. . तपास हवालदार सणस, बोडरे व भिंगारदिवे करत आहेत.

घरात चोरी, मुलीविरोधात गुन्हा

सत्य सह्याद्री/सातारा
आगुंडेवाडी, ता. जि. सातारा येथील रहात्या घरातून 71 हजार 500 रुपयांचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी मुलीविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णराव चांगदेव आगुंडे (वय43, रा. आगुंडेवाडी) यांनी फिर्याद दिली. पायल असे गुन्हा दाखल झालेल्या मुलीचे नाव असून. पायलने घरच्या स्वयंपाकघरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले 71 हजार 500 रुपये किंमतीचे एक तोळे वजनाचे गंठण व पाच ग्रॅम वजनाची दोन कर्णफुले असा ऐवज चोरून नेल्याचे म्हटले आहे. पोलीस नाईक बोडरे तपास करत आहेत.

महिलेची मोहनमाळ हिसकावली

सत्य सह्याद्री/सातारा
पोवईनाका ते कोरेगाव रस्त्यावर रेणूका पेट्रोल पंपाच्या कोपर्‍यावर चालत निघालेल्या महिलेची 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ हिसकावून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. स्वाती रतन आढाव (वय 58, रा. क्षेत्रमाहुली) यांनी फिर्याद दिली. दि. 4 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका चोरट्याने चोरी केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास महिला पोलीस नाईक शिंदे करत आहेत.  

शेअर मार्केटच्या नावाखाली शिक्षिकेची 20 लाख 50 हजारांची फसवणूक

सत्य सह्याद्री/सातारा
वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करून त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करायला सांगत शेअर मार्केट अ‍ॅप डाऊनलोड करून घेत 20 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर शाखेत दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिपिका बबिता जसवीर चौहान (वय 33, सध्या रा. 14 साईपुष्प सोसायटी, चार भिंती, सातारा, मूळ रा. जोगियो, ता. चकरा, उत्तराखंड) यांनी फिर्याद दिली. अशोक धनकर व त्याची असिस्टंट प्रीती शर्मा एकेआय मॅनेजर, अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल मोरे करत आहेत.


Post a Comment

0 Comments