Ticker

6/recent/ticker-posts

हरणाचे मटण धसांसाठीही, खोक्याचे कारनामे घराच्या झडतीत समोर

बीड – ‘बीड म्हणजे छोटा बिहार’ असं म्हटलं जात होतं. ते का म्हणायचे हे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर महाराष्ट्र आणि देशाला कळाले. बीडमध्ये टप्प्या टप्प्यावर एक वेगळा वाल्मिक कराड समोर येत आहे. संतोष देशमुख हत्येविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस देखील एका गुंडामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिरुरमधील आकाचा आका कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात अनेक संशयास्पद साहित्य सापडले आहे. वाळलेल्या मांस देखील जप्त करण्यात आले आहे.
सुरेश धसांना जायचे हरणाचे मटन
शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याला शिकारीचा शौक आहे. त्याने मारलेल्या हरणांचे मटण आमदार सुरेश धस यांना पोहोचते केले जाते. त्यामुळेच स‍तीश भोसले याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते टी.पी. मुंडे यांनी केला आहे. हा खोक्या आणि त्याचे साथीदार चार-दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचे असा गंभीर आरोप त्यांनी केला. टी.पी. मुंडे म्हणाले की, प्रकरणासंदर्भात वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे. मात्र त्यांच्या बॉसला, मुख्यमंत्री फडणवीस यांची मी विशेष भेट घेणार आहे.
खोक्याच्या घरावर पोलीस आणि वनखात्याचा छापा
पोलीस आणि वन विभागाकडून आज खोक्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य सापडलं आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान शिरुर तालुक्यातील नागरिक आता चांगलेच आक्रमक झाले असून, उद्या (9 मार्च) शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे.
खोक्याला अटक करण्यात अडचण काय?
खोक्या उर्फ सतीश भोसलेचे एक-एक कारनामे आता समोर येत आहे. कार आणि घरामध्ये पैशांचे बंडल घेऊन रिल्स तयार करण्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्याच्या घरात सापडलेले मांस आणि शिकारीचे साहित्य यानंतर गावकरी संतप्त झाले.
बावी गावचे रहिवासी दिलिप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांच्या शेतात सतीश उर्फ खोक्या भोसले याने हरणाची शिकार करण्यासाठी जाळ लावलं होतं. त्यात एक हरीण अडकलं. ते हरीण सोडवण्यासाठी तिथे ढाकणे कुटुंब पोहोचले तर त्याने ढाकणे कुटुंबातील वडील आणि मुलाला बेदम मारहाण केली. मुलाचे दात पाडले, वडिलांचे हाड मोडले. दिलीप ढाकणे यांच्या मुलाचा पाय मोडला. पोलिस अजूनही त्याला का अटक करत नाही असा सवाल करत ग्रामस्थ म्हणाले, आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, पोलीस आरोपीला अटक करत नाहीत, नेमकी त्यांना काय अडचण आहे? असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments