Ticker

6/recent/ticker-posts

जनावरे चोरीतील फरार आरोपीस अटक


 मायणी/प्रतिनिधी:

जनावरे चोरी गुन्हयांतील सुमारे 3 वर्षापासून फरारी असलेला आरोपीस  वडूज पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी,वडूज पोलीस ठाणे गुन्हा रजि नं 211/2021 भादविस कलम 379 मधील आरोपी नामे सागर जालिंदर पाटोळे रा वेजेगांव ता. खानापूर जि सांगली याने वडूज पोलीस ठाणे हद्दीत 09/07/2021 ते 10/07/2021 चे दरम्यान किसन सिताराम तुपे रा तुपेवाडी ता. खटाव जि सातारा यांचे गोटयावरील दोन जर्सी गायी चोरून नेहले होते. सदर आरोपी हा सुमारे 3 वर्षापासून फरारी होता. पोलीस अधीक्षक  समीर शेख,  अप्पर पोलीस अधीक्षक, ऑचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी  अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी घनश्याम सोनवणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, पो.हे.कॉ. नाना कारंडे, पो.हे.कॉ.अमोल चव्हाण,  पोहेकॉ आनंदा गंबरे, पोहेकॉ कृष्णा साळुंखे, पोकॉ प्रदीप भोसले, पोना प्रविण सानप, पोकॉ काळेल, पोकॉ बापू शिंदे, पोकॉ/ द­याबा नरळे यांनी मायणी पोलीस ठाणे हद्दीत पक्षी अभयारण्य मायणी येथे सापळा लावून सुमारे 3 वर्षापासून फरारी असलेला आरोपी सागर जालिंदर पाटोळे रा  वेजेगांव ता .खानापूर जि सांगली यास शिताफीने ताब्यात घेतले.

फोटो ओळ वडूज: जनावरे चोरीतील फरार आरोपी जालिंदर पाटोळे समवेत पी. आय. घनश्याम सोनवणे व इतर

Post a Comment

0 Comments