मोळेश्वर-धारदेव कास मार्गे सातारला हा मार्ग जाऊन मिळत असून या मार्गावर अनेक गावे येत आहेत. हा मार्ग खूपच अरुंद व वळणावळणाचा आहे. या मार्गावर एक दोन ठिकाणी दरडी कोसळण्याच्या धोका पावसाळ्यात दरवर्षीच असतो, लहान मोठे दगड रस्त्यावर येण्याचे प्रमाण देखील अधिक असते. दि.२७ रोजी धारदेव घाटात दरड कोसळली असून दरड लवकर हटवून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ तसेच वाहनचालकांमधून होऊ लागली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.महाबळेश्वर तालुक्यातील धारदेव गावाजवळ असणाऱ्या धारदेव घाटात एक भली मोठी दरड रस्त्यावर कोसळली असून हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला आहे. महाबळेश्वरला आपल्या दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्यांना मार्गात दरड कोसळली असल्याने माघारी परतावे लागले.
No comments:
Post a Comment